विस्टन चर्चिल एकदा म्हणाले होते कि "युद्ध फार वाईट असते पण राष्ट्राची
मानहानी त्यापेक्षा कितीतरी वाईट असते".भारताच्या दोन निधड्या छातीच्या जवानांची निघृण
हत्या होते आणि आपले सरकार त्याचा फक्त निषेध नोंदविते.अशावेळी स्वतंत्र भारताच्या
नागरिकांच्या स्वाभिमानाला तडा जातोय हि गोष्ट आपल्या सरकारच्या ध्यानी का येत नाही
? आजकालच्या घटनाकडे पाहिलं तर भारताच्या श्यामळू कुणाचाच विश्वास राहिला नाही
.भारतीय तरुणांना नव्या तगड्या नेतृत्वाची गरज भासत आहे.भारतातील हे नवीन नेतृत्व भारतीय
तरूणांच खर नेतृत्व असावं अशी आम्हा तरुणांची अपेक्षा आहे.राजकीय
पक्ष,त्यांची सत्तापिपासू वृत्ती, फायदा बघून बदलणारी तत्वे या सर्वांपासून
सुटका होण्याची वाट भारतीय तरुण बघत आहे.
भारतातील हि अराजकाची स्थिती पाहून मला एका नाझी जनरलने सांगितलेले वाक्य
आठवतेय,"जेव्हा व्यवस्था ढासळू लागेल,जेव्हा सत्ताधारी लोक स्वार्थासाठी राष्ट्राला
दावाणीस बांधतील,लोकांचा धर्म,राष्ट्र आणि तत्वान्वरचा विश्वास ढळू लागेल तेव्हा याला
विरोध करण्यासाठीविरोध करण्यासाठी जनतेतून एक नेता समोर येईल आणि तो सत्ता हातात घेईल
आणि यासाठी जरी त्याला रक्तामासाचा चिखल तुडवावा लागला तरी तो डगमगणार नाही "
सरकारने स्वत:ला आणि देशाला पण सावरावे नाहीतर..... हो क्रांती होणारच
.पण त्यासाठी रक्तामासाचा चिखल तुडवावा लागू नये एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना.
तसे क्रांती अपेक्षित असेल तर बालीदानाशिवाय शक्य नाही .कारण आपण हीच भाषा जाणतो .सहज जादूची छडी फिरवल्यासारखी क्रांती घडली आणि सद्य परीस्थित बदल झाला ,तर कुणाला नको आहे .असा तथाकथित नेता किंवा ईश्वर अवतार पुढे येईल देशाला वाचवेल हे स्वप्नवत वाटते.बाकी छान लिहिले आहे .शुभेच्छा
उत्तर द्याहटवा