गुरुवार, २१ मार्च, २०१३

चे गव्हेरा



चे  गव्हेराचा फोटो लाखो टी शर्ट वर पाहिलय ,पण चे  गव्हेरा कोण हे किती जणांना माहित आहे?
          
              


                   चे  गव्हेराचा हा फोटो जगातील सगळ्यात प्रसिध्द फोटो आहे,चे  गव्हेरा पेक्षा त्याचा फोटोच प्रसिध्द आहे.  ज़नरलि हे उलट असत. डॉक्टर गव्हेरा  हा मार्क्सवादी क्रांतिकारक, लेखक, गनिमी लढवय्यांचा म्होरक्या, राजकीय नेता आणि लष्कर तज्ञ होता.पेशाने डॉक्टर असला तरी गनिमी काव्याच्या लढाईत त्याच्यासारखा कसलेला योद्धा विसाव्या शतकात तरी शोधून सापडणार नाही.अर्जेन्तिनाचा नागरिक असला तरी त्याने दक्षिण अमेरिकेतील कित्येक देशांमध्ये सशस्त्र लढा दिला . 
               परवा मी लायब्ररीतून एक बुक काढलं The motorcycle diaries तेव्हा मला समजल कि चे गव्हेरा या डॉक्टरच एका क्रांतिकारक महानायाकात रुपांतर कस झालं.चेला डीग्री मिळाल्यानंतर त्याने संपूर्ण दक्षिण अमेरिका खंडाला मोटार सायकलीवरून वळसा घालण्याचा बेत आखला . त्याच्या या मोहिमेत त्याचा मित्र अल्बारतो हा त्याच्या साथीला होता .चे ने १९५२  आणि ५३ साली चिली,कोलंबिया,पेरू,पनामा,क्युबा  या देशांना भेटी  दिल्या. या भेटीमध्ये त्याने दक्षीण  अमेरिकेतील दारिद्र्य,गरिबी,दु:ख यांचा सामना केला . आणि या देशांतील नागरिकांच्या दुरवस्थेला अमेरिकाचा कारणीभूत आहे असं त्याच ठाम मत बनलं .याच भटकंती मध्ये  ''दक्षिण  अमेरिकेला एकाच पूर्वजांचा वारसा मिळाला आहे आणि दक्षिणेकडील लोकांनी एकत्र आले पाहिजे'' अशी चे ने मत बनविले .पुढे  क्युबा आणि बोलिव्हिया मध्ये लढताना त्याने हाच विचार डोळ्यासमोर ठेवला होता .
             दक्षिण अमेरिका फिरून झाल्यावर चे ने मेक्सिकोमध्ये एका इस्पितळात नोकरी पकडली.चे गव्हेरा मेक्सिकोमध्ये असताना त्याची भेट फिडेल कअस्ट्रो शी झाली त्यावेळी त्या दोघांमध्ये मैत्री झाली आणि मग पुढे बतीश्ता सरकारच्या विरोधात चे फिडेल च्या मदतीला धावला होता .   पण मनातील उर्मी स्वस्थ बसू देत नसल्यामुळे त्यानंतर बतीश्ता सरकारच्या विरोधात सशस्त्र लढा देण्यासाठी  चे ने फिडेल आणि राउल च्या मदतीसाठी क्युबामध्ये जायचं ठरवील,यासाठी एका छोट्या जहाजातून आपल्या ८२  क्रांतिकारक सैन्यासह तो क्युबाच्या किनारपट्टीवर उतरला . पण बतिष्टच्या सैन्याने हल्ला केल्यामुळे त्याचे अनेक साथीदार मारले गेले.  जीव वाचविण्यासाठी आणि प्रतिहल्ला करण्यासाठी चे ने तिथल्या पर्वत रांगात आश्रय घेतला . तिथे त्यांना स्थानिक लोकची मदत मिळाली.यानंतर मग चे,फिडेल आणि राउल कस्ट्रो यांनी क्युबाचा तो प्रसिध्द "२६ जुलैचा उठाव " केला . या उठावामध्ये आपल्या मुठभर सैन्याच्या मदतीने बतीस्त च्या हजारोंच्या सैन्याचा पराभव केला आणि बतीश्ता ला क्युबा सोडून पळून  जाण्यास भाग पाडले .  क्युबामधील उठावानंतर चे ने क्युबाच्या पुनर्बांधणीमध्ये मोलाची कामगिरी बजावली . त्याला क्युबाच्या राष्ट्रीय बँकेचे गव्हर्नर पद देण्यात आले.
                क्युबाच्या पुनर्बांधणीसाठी त्याने रशियाकडून मदत घेतली .त्याने या काळात भारत,जर्मनी,इजिप्त अशा अनेक देशांना भेटी दिल्या .  क्युबा स्थिर झाल्यानंतर त्याने क्युबाच्या राजकारणातून अंग काढून घेतले. पण त्याच्यातील  क्रांतिकारक त्याला शांत बसू देत नव्हता . त्याने मग कोंगो या आफ्रिकन देशातील क्रांतीत सहभाग घेतला . त्याला अन्यायाविरुध्ध लढा देण्यासाठी कोणत्याही देशाच्या सीमा मंजूरच नव्हत्या . कोंगो मध्ये त्याने आपल्या गनिमी काव्याच्या तंत्राचे प्रशिक्षण आफ्रिकन लोकांना दिले. याही ठिकाणी त्याच्या युद्धतंत्राने कोंगो सरकारला मात दिली.
 
                कोन्गोमधील मिशन संपल्यावर  चे गव्हेरा आता बोलीवियाच्या क्रांतीत सहभागी झाला .   सुरुवातीच्या काळात गव्हेराच्या मोजक्या सैन्याने बोलीवियाच्या प्रशिक्षित सैन्याचा छोट्या चकमकीत सपशेल पराभव केला . पण नंतर अमेरिकन सरकारने बोलिविया सरकारला प्रशिक्षित कमांडो पुरवायला सुरुवात केली .त्याचबरोबर गाव्हेराच्या सैन्याचा क्युबाशी असलेला रेडियो संपर्क तुटला या सर्व अडचणींमुळे गव्हेरा आणि त्याचे क्रांतेकारी एकटे पडले . पण गव्हेरा अजून बोलीवियामाध्येच टिकून होता पण अचानक एका रात्री बोलिव्हियाच्या आर्मीने गाव्हेराच्या तळावर हल्ला केला . गव्हेराच्या  सर्व साथीदाराना अमानुषपने मारून टाकण्यात आले आणि जबर जखमी  असलेल्या गाव्हेराला पकडण्यात आले आणि दुसर्या दिवशी त्याचा खून करण्यात आला . त्याचे शेवटचे शब्द होते ,''मला माहित आहे तुम्ही मला मारायला आलात,पण तुम्ही मला मारलं पण क्रांती अमर राहील "

गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१३

गुपित



आठवते मज 
भेट आपुली 
शब्दात बांधली 
शपथ आर्त ती 
वचनामध्ये 
बांधुनी मज 
निरोप होता 
तो भयंकर 

शपथ पाळ 
मज सांगून गेली 
शपथ पाळणे
तिला न जमले 
शपथ  अशी 
मोडुनी तरी  
माझ्यावरती 
राग तिचा 

मला कळेना 
शपथ घालूनी 
शपथ तोडणे 
डाव मांडुनी 
डाव उधळणे 
जमले 
कसे हिस 
असे वागणे 

क्षणभून्गुरता 
शब्दांची मग 
समजून आली 
मला अवेळी 
तळपणाऱ्या 
या सुर्याखाली 
शपथेला त्या 
किमंत नव्हती 

गुपित आपुले 
तू जरी फोडिले 
मज हृदयात 
सांभाळीन मी 
या प्राणांच्या 
मोलाहुनी 
                           -निखिल 

मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१३

बुद्धिबळ


                    परवा संजीवनमध्ये(माझं  कॉलेज ) बुद्धिबळाच्या स्पर्धा होत्या.सहज टाईमपास म्हणून या टेबलावरून त्या टेबलावर बुद्धिबळाच्या पतांचे निरीक्षण करीत हिंडत होतो.असाच फार वेळ हिंडल्यावर एका टेबलावर नजर स्थिरावली,आणि जरा विचार केल्यावर माझ्या एक गोष्ट लक्षात आली कि  बुद्धिबळात आणि आपली नॉर्मल आयुष्यात फार साम्य आहे.  बुद्धिबळात सोंगट्याच्या चाली वेगवेगळ्या असतात आणि त्याच प्रमाणे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या स्वभावात देखील आपल्याला फरक दिसून येत असतो.प्रत्येक सोंगटीच्या चालीबरोबर मला आजूबाजूला आढळणाऱ्या व्यक्तिरेखांशी आढळणार साम्य दिसून आलं.आणि जेव्हा मी या सगळ्या सोंगट्याचा अभ्यास केला तेव्हा मला हे कळून चुकल कि  बुद्धिबळ या खेळाची रचना हि आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहे.मला जे समजल ते मी पुढे मांडत आहे,

प्यादा :-
            प्यादा हा बुद्धिबळातील सगळ्यात साधा घटक.जगाप्रमाणे बुद्धिबळातही यांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे आणि यांच्याकडे कोणतेही विशेष कसब नसते,यांची झेप आणि चाल देखील छोटी असते पण तरीही ते महत्वाचे असतात.कोणत्याही कंपनीचा पाया जसा त्यांची work force असतो,तसा हा बुद्धिबळाचा पाया असतो. याना काही जास्त महत्व दिल जात नाही,उलट जेव्हा महत्वाच्या सोन्गटीला वाचावयाच असतं तेव्हा यांचा सोयीस्कररीत्या बळी दिला जातो कारण त्यांच्या नसण्याने कुणाचेही काही अडत नाही.यांना नेहमी पुढे उभं केलं जात(का ते माहित नाही कदाचित प्रहार झेलण्यासाठी ). 
    पण जेव्हा यातलाच एक प्यादा संपूर्ण पट पार करून पलीकडे पोहोचतो तेव्हा त्याचा वजीर होतो.that means खऱ्या आयुष्यातदेखील प्रत्येक प्याद्याला संधी असते,तोही वजीर बनू शकतो पण त्यासाठी त्याला परिस्थितीचा पट पार करण्यासाठी झगडाव लागतं .

हत्ती :-
     प्रचंड ताकद आणि सरळमार्ग,असं "rare combination". आपली प्रचंड ताकद वापरताना सरळ आणि नैतीकतेने वापरण्याची अक्कल यांच्याकडे असते.हे लोकच बुद्धिबळ आणि समाजाचे खरे बल असतात.

घोडा :-
     यांची चाल समाजाने  थोडे अवघड असते.यांच्यात झेप घेण्याची कुवत असते.शत्रूसाठी यांचा धोका ओळखण फार अवघड असत कारण म्हणजे इतर कुणाकडेही नसलेली चाल यांच्याकडे असते आणि ते अडथल्यापलीकडेही पाहू शकतात यामुळे यांच्या पंखाखाली फार मोठा प्रदेश असतो. 

उंट :-
     तिरकी चाल.तिरक्या चालीच्या उंटाबद्दल मी वेगळ काय सांगणार कारण आपल्यापैकी प्रत्येकजण कधीना कधीतरी या अशा लोन्कांकडून भाजलेला असतो.तरीही असे लोक समाजात असतात आणि त्यांना समाजात  स्थान देखील असते.

वजीर :-
      बुद्धिबळाच्या पटावरचा " सर्वशक्तीशाली योद्धा ".यांच्या भात्यात अनेक शस्त्रे असतात, यांच्या चाली अनेक असतात.शत्रूसाठी सर्वात धोकादायक म्हणून याचं नाव असत.हा जेव्हा पटावर असतो तेव्हा बाजी जिंकण्याच्या आशा असतात आणि जेव्हा तो नसतो तेव्हा साऱ्या आशा मावळतात.हा नेहमी फ्रेममध्ये असतो.साऱ्यांच लक्ष याच्याकडेच लागून राहिलेले असते.हा त्या पटाचा खरा नेता/लीडर असतो.

राजा :-
      राजा हा top ला असतो.तास पाहिलं तर हे देखील एक प्यादाच असतं यांच्यात कोणताही विशेष गुण किंवा कसब नसतो  .पण सत्ता,अधिकार आणि पैसा या गोष्टी  त्याला उच्च  बहाल करतात. बुद्धिबळात आणि माझ्या मते समाजातही  लोक  उपयूक्त ठरत नाहीत उलट त्यांना वाचविण्यासाठी,त्याचं रक्षण करण्यासाठीच इतरांची शक्ती आणि वेळ खर्च होत असतो. 


                माझ्यामते ज्याने कुणी  बुद्धिबळ हा खेळ बनविला त्याने तो बनविताना तत्कालीन समाजातील या गोष्टी नक्कीच लक्षात घेऊन या महान खेळाची रचना केली असेल .

बुधवार, ३० जानेवारी, २०१३

स्वार्थत्याग


 "स्वार्थत्याग" हा गुण महान राष्ट्राच्या नागरिकाच्या अंगी असावा लागतो.

          कधीतरी मी स्वत:ला हा प्रश्न विचारतो कि भारतीय नागरिकांच्या अंगी हा गुण आहे काफार काथ्याकुट केल्यावर मला उत्तर मिळते "नाही",आजूबाजूला पाहिलं तर माझ्या या वाक्यातील सत्यांश आपल्या ध्यानी  येईल.भ्रष्टाचाराविरुद्ध कितीही बोंबाबोंब केली तरी सिग्नलवर १०० रुपयांचा दंड भरण्या ऐवजी  आपण पोलिसाला "साहेब ५० मध्ये अडजस्ट करा कि " म्हणून खुली ऑफर देतोआपण ५० रुपयांच्या फायद्यासाठी व्यवस्था भ्रष्ट करतो मग खरच आपणास भ्रष्टाचाराविरुद्ध बोलण्याचा अधिकार पोचतो का?
          आपल्या इथे एखादा गरीब आणि स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार निवडणूक जिंकल्याची उदाहरणे किती आहेत? अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच उदाहरणे सापडतील.आज जे देशात माजलय त्यानंतरही कॉंग्रेस परत जिंकून येऊ शकते याच  कारण  मते देताना आपण आपली तत्वे,विचार आणि सारासार विचारशक्ती बासनात बांधून ठेवलेली असते.आणि एकदा का मतदान करून बाहेर पडलो कि मग  मोठमोठी तत्वज्ञान सुचू लागतात,

      “देवा पांडुरंगा या देशाला वाचीव बाबा” 

शुक्रवार, ११ जानेवारी, २०१३

क्रांती


                         विस्टन चर्चिल एकदा म्हणाले होते कि "युद्ध फार वाईट असते पण राष्ट्राची मानहानी त्यापेक्षा कितीतरी वाईट असते".भारताच्या दोन निधड्या छातीच्या जवानांची निघृण हत्या होते आणि आपले सरकार त्याचा फक्त निषेध नोंदविते.अशावेळी स्वतंत्र भारताच्या नागरिकांच्या स्वाभिमानाला तडा जातोय हि गोष्ट आपल्या सरकारच्या ध्यानी का येत नाही ? आजकालच्या घटनाकडे पाहिलं तर भारताच्या श्यामळू  कुणाचाच विश्वास राहिला नाही .भारतीय तरुणांना नव्या तगड्या नेतृत्वाची गरज भासत आहे.भारतातील हे नवीन नेतृत्व भारतीय तरूणांच खर नेतृत्व असावं अशी आम्हा तरुणांची अपेक्षा  आहे.राजकीय  पक्ष,त्यांची सत्तापिपासू वृत्ती,   फायदा बघून बदलणारी तत्वे या सर्वांपासून सुटका होण्याची वाट भारतीय तरुण बघत आहे. 
                       भारतातील हि अराजकाची स्थिती पाहून मला एका नाझी जनरलने सांगितलेले वाक्य आठवतेय,"जेव्हा व्यवस्था ढासळू लागेल,जेव्हा सत्ताधारी लोक स्वार्थासाठी राष्ट्राला दावाणीस बांधतील,लोकांचा धर्म,राष्ट्र आणि तत्वान्वरचा विश्वास ढळू लागेल तेव्हा याला विरोध करण्यासाठीविरोध करण्यासाठी जनतेतून एक नेता समोर येईल आणि तो सत्ता हातात घेईल आणि यासाठी जरी त्याला रक्तामासाचा चिखल तुडवावा लागला तरी तो डगमगणार नाही "
                        सरकारने स्वत:ला आणि देशाला पण सावरावे नाहीतर..... हो क्रांती होणारच .पण त्यासाठी रक्तामासाचा चिखल तुडवावा लागू नये एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना.

रविवार, ३० डिसेंबर, २०१२

वर्षाखेर


                                          "अलविदा २०१२" 

                     आणखी एक वर्ष सरलं .२०१२ संपल पण जग काही बदल नाही यातच सगळा आनंद आहे.कारण या वर्षातील महागाई ,बलात्कार,अपघात या सर्वांचा जो महापूर आला होता तो पाहून जग नक्की बुडणार अशी धास्ती कित्येकांना वाटत होती.पण तास काय झाल नाही यातच आनंद.आता २०१३ न आपल्या गर्भात काय लपविलाय ते त्यालाच माहित,पण आपण त्याच्याकडून चांगल्याच अपेक्षा ठेवू.
                      बाकी वर्ष संपताना अनेकांना हिशोब मांडायची सवय असते.या वर्षात काय मिळवील आणि काय गमावलं याचा .वर्षाचा सुरुवातीला किती संकल्प केले आणि त्यातील किती पूर्ण केले हे पाहिलं तर लक्षात येत कि आपण प्लान करण्यात पटाईत आहोत पण केलेले प्लान वास्तवात उतरविण्यास आपण सोयीस्कर रित्या विसरलो आहोत.पण हे लक्षात मात्र येते वर्षाखेरीस.मग आपण मनाशीच म्हणतो कि आता नाही जमले न मग पुढच्या वर्षी.
प्रत्येक वर्षी ३१ डिसेंबर चा जल्लोष प्रत्येकासाठी वेगळा असेल पिणारे पितील,खाणारे खातील,प्रत्येकाची वेगळी तऱ्हा.प्या पण पिउन गाडी चालविण्याचे उपकार पब्लिकवर करू नका हीच विनंती.
आणि आता या वर्षाला निरोप देताना जमल तर या वर्षी केलेल्या चुका पुढच्या वर्षी होऊ देऊ नका.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
HTML Comment Box is loading comments...