गुरुवार, २६ जुलै, २०१२

झोंबी

                                परवा लायब्ररीच्या मराठी सेक्शन मध्ये  झोंबी सापडली. कव्हर बघून एखादे आत्मचरित्र वाटले पण वाचायला सुरुवात केल्यावर समजले कि हि तर एका अपूर्व वेदनेची गाथा आहे.                                                                                                                                                                 कालच  "झोंबी" वाचून खाली ठेवली.डोक सुन्न झाल. आज आम्ही किती lucky आहोत.शिक्षण मिळविण्यासाठी कुणी एवढ्या यातना सोसल्या असतील हि कल्पना पण करवीत नाही.शाळेत घवघवीत यश मिळवून पण चाबकाचा मार जर आम्हाला मिळाला असता तर आमच काय झाल असत याची कल्पनापण करावीत नाही. 
                                  आन्दाची शिक्षणासाठीची तळमळ मनात ठासून जाते.त्याची स्वप्ने त्याच्या बापापेक्षा वेगळी असतात.त्याला शिक्षणाची ओढ होती पण त्याला ते मिळत नव्हत,यातूनच त्याची वेदना जन्माला आली, त्या  वेदनेतून त्याने त्याची कविता साकारली,आणि जन्माला आला मराठीतला एक कवी "आनंद यादव "
                                  गरिबी म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल  तर "झोंबी" नक्कीच वाचा आणि आपल्या बापाला शिव्या देवून त्याचा वाइटपनाचा उद्धार करणाऱ्यांनी तर हे पुस्तक नक्कीच वाचावे कारण एखादा बाप किती वाइट असू शकतो हे जर जाणून घ्यायचं असेल तर आनंद यादवांनी चितारलेला "दादा"वाचलाच पाहिजे. आडमुठेपनाच सगळ्यात इरसाल उदाहरण म्हणजे आन्दाचा बाप,त्याची एक वेगळीच "philosophy " होती, शिक्षण म्हणजे मुलं वाया घालविण्याची जागा हे त्याच प्रामाणिक मत. दहा बारा पोर होवूनही हे देवाची देणगी असा त्याच मत,मग भले पोर उपाशी राहून मेली तरी याच  त्याला काही सोयरसुतक नाही.      झोबीचा नायक जरी अन्दा असला तरी त्याचा बाप मात्र जास्तच भावला. 
                                 परिस्थितीशी झगडणारा नायक फार वेळा वाचलंय, पण आनंदा फारच जवळचा वाटला 
त्याची झोंबी जरा जास्तच झोंबली .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
HTML Comment Box is loading comments...