कसबस ताईच लग्न पार पडलं,पण
रात्रभर ओंक्याच्या डोळ्यावर ती मोरपंखीच उभी राहत होती,उसने तो ईस बिचारे कि रातोंकी
निंद हराम कर दि थी.आता ओंक्याला काहीही करून तिला भेटन भागच होत.लग्नानंतर ताईच्या
सासरी गोंधळ होता,घरून सगळेच जाणार होते.ताईकडे जाण्याची तयारी पूर्ण झाली होती ओंक्या
अगदी ठेवणीतले कपडे घालून तयार झाला.पण बाहेर येऊन बघतो तर काय? गाडीच्या फॅक्टर ऑफ
सेफ्टी पेक्षा दुप्पट माणस बसल्यामुळे त्याला जागाच उरली नव्हती.त्याला न्यायचं कॅन्सल
करायचा विषय चालू झाला आणि एवढ्यात त्याच्या बाबांचं लक्ष त्याच्या चेहऱ्याकडे गेलं.त्याचा
रडका चेहरा बघून त्याला त्याच्या ताईची फारच आठवण येत असेल असा गैरसमज त्याच्या बाबांनी
करून घेतला आणि मग त्यांनी नवीन गाडी भाड्याने घेतली.रात्री ताईच्या घरी पोचल्यानंतर
ओंक्याची नजर सारखी आत वळत होती.या नव्या पाहुण्याला फारच भूक लागली असेल म्हणून पटकन
पंगती वाढायला सुरुवात झाली.इतक्यात ती वाढायला आली आणि तिला पाहताच ओंक्याच्या अंगात
बकासुर संचारला आणि ओंक्याने मग भावनेच्या भरात तांबडा रस्सा,पांढरा रस्सा आणि
मटनावर मनसोक्त ताव मारला.
क्रमश: ............................................
जाताना ताईची भेट घ्यायला गेला तेव्हा तिथे ती मोरपंखी बसलेली होती.ताईने मग
दोघांची ओळख करून दिली. " पिंकी " हे नाव ऐकताच त्याने मनातल्या मनात
" पिंकी ओंकार चव्हाण " या नावांची जुळवाजुळव केली हे नाव परफेक्ट जमतंय
अस त्याच्या मनाला उगाचच वाटून गेलं.आणि तिथल्या गप्पांमध्ये पिंकीला मटणाचा वासही
सहन होत नाही हे ऐकताच खाल्लेलं सार मटण गळ्याशी येतंय कि काय अस त्याला वाटून गेलं.आता
तर मग ओंक्याने फुल अक्शनमध्ये येवून प्रतिज्ञाच केली,"पिंकी,तुमच्यासाठी कायपण,"सोडलय
आता आम्ही मटनपण" या क्षणी ओंक्याने त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा त्याग पिंकीसाठी
केला होता.जेव्हा एखादा कोल्हापूरचा माणूस कुणासाठीतरी मटण सोडतो तेव्हा त्याला आपलं
प्रेम सिद्ध करायला दुसर कुठलच प्रमाणपत्र द्यावं लागत नाही.कारण मटण खाण सोडन आणि
तेही एका कोल्हापुरकराने हा त्याच्या त्यागाचा परमोच्च बिंदू असतो.
काही दिवसातच मग सत्यनारायणाची
पूजा होती , ओंक्याला आणखी एक चान्स मिळाला होता.या पूजेत ओंक्याने फारच प्रगती साधली
होती त्याच्या प्रगती समोर तर चीनच्या प्रगतीचा दरही फिका पडला होता.पूजेच्या संपूर्ण
संध्याकाळी नजरांचे बाण सटासट चालविले जात होते.ओंक्या तर क्षणाक्षणाला घायाळ होत होता.शेवटी
निरोपाच्या क्षण आलाच.गाडीत बसताना पिंकीने ओंक्याला स्माईल दिली आणि एवढ्यात विजांच्या
गडगडाटसह पाऊस सुरु झाला.एका वेगळ्याच रोमांटिक आनंदात ओंक्या परतीचा प्रवास करीत होता.बाहेर
पडणारा पाऊस त्याच्या मनातील कल्लोळासमोर क्षणाक्षणाला फिका पडत चालला होता.आतातर ओंक्याला
गप्प बसून चालणार नव्हता त्याने प्रचंड खटपटी करून सरतेशेवटी नंबर मिळविलाच.
२० जूनला त्याने तिला पहिला मेसेज केला.हाय ह्यालोपासून सुरुवात झाली.इकडच्या तिकडच्या
गप्पा मारीत गाडी मुख्य रस्त्याकडे हळूहळू सरकू लागली होती,आणि प्रेमाचं इंजिन बेफामपणे
धावू लागल होत. आपली परफेक्ट मच हीच आहे याची खात्री ह्या दोघांनाही हळूहळू पटू लागली
होती.अश्याच एका निवांत क्षणी २२ जूनला पिंकीने ओंकारसमोर प्रश्नाचा अनपेक्षित बॉम्ब
टाकला,
"तुझा प्रेमावर विश्वास आहे?"
.
.
.
"माझा जेवढा तुझ्यावर विश्वास आहे तेवढाच विश्वास माझा प्रेमावर
आहे."

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा