मग ओंकारची परवानगी मिळाल्यावर पिंकीने दोघांच्या रीलेशनविषयी तिच्या घरी सांगितलं.तिच्या घरी थोडी खळबळ माजली पण ते सार्वजन ओंकारला चांगले ओळखत असल्याने त्यांनी सरळ ओंकारला त्याच्या घरी हा विषय काढण्यास सांगितले. मग ओंकाराने आपल उरलं सुरलं धैर्य एकवटून पप्पांना विचारलं,आणि मग पंधरा मिनिटांच्या प्रदीर्घ विचारानंतर पप्पा उद्गारले,
"हे लग्न शक्य नाही ,हे बघ पप्या(ओंकारला घरी पप्या म्हणतात ) अजून तू शिकतोयस
,तुला डिग्री मिळायला अजून तीन वर्ष लागतील कदाचित जास्तीही लागतील मग एवढी वर्ष त्या
मुलीचं लग्न अडवून ठेवन मला तरी बरोबर वाटत नाही "
पप्पांकडून हे उत्तर मिळाल्यामुळे ओंकाराने मम्मीशी या विषयी बोलण्याचे टाळले.पण आता ओंकाराची सारी विचारशक्तीच खुंटली होती.पप्पा नाही म्हणतील अशी अपेक्षा त्याने कधीच केली नव्हती.त्याला हा नकार सहनच होत नव्हता.या सगळ्या गोंधळातच त्याचा m3 चा पापर दुसऱ्या दिवशी होता आणि या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अपेक्षेप्रमाणेच पेपर अवगड गेला m3 सुटण्याची काहीच आशा नव्हती आणि आशा मनस्थितीत m3 सुटणे शक्यच नव्हते . याच वेळी पिंकीचे फोन आणि एकनदरीतच या प्रकारामध्ये त्याला concentrate करता येईनासे झाले होते.या मुळे पुढचे ATD,ETCP हे पेपर देखील त्याने या प्रेशरमधेच दिले . हे तिन्ही पेपर सुटणारच नाहीत हे त्याला समजून चुकले.ETCP चा पेपर झाल्यावर ओंकाराने थोडा विचार केला आणि आपला मोबइल बंद करून ठेवला आणि सगळ विसरून अभ्यासाला लागला. आणि मोठ्या प्रयत्नाने concentrate करून उरलेले विषय सोडविले.पुढचे १५ दिवस फोन नाही आणि मेसेजपण नाही.
परीक्षा झाल्या झाल्या ओंक्याने मुंबई गाठली.८ जानेवारी हि पिंकीशी भेटण्याची तारीख ठरवली.हि त्यांची भेट त्यांच्या प्रेम कहाणी सारखीच विचित्र होती.कारण तशी हि त्यांची पहिलीच खरी भेट होती आणि पहिल्या भेटी आधीच त्यांनी आपल लग्न एकमेकांशी ठरवून टाकल होत.दोघेही त्या दिवशी त्यांच्या दूरच्या नातेवाइकांच्या घरी भेटले.पण घरात वादलाधारी माणसे असल्याने त्यांना नीटपणे बोलताच आले नाही.मग काय? शेवटी ओंकार इंजिनियर होता. आणि technology is friend of engineer ओंकाराने मोबाईल उचलला आणि मग दोघांनी समोरासमोर chating सुरु केले. आणि १२ तारखेला बाहेर भेटायचा प्लान बनविला.
१२ तारखेला दोघे फिरायला बाहेर पडले.दोघे एकमेकांत पूर्णपणे हरविले होते.भावना शब्द बनून बाहेर पडत होत्या.नॉनस्टोप गप्पा चालू होत्या.यावेळी ओंकाराच्या लक्षात आल कि पिंकीशिवाय जगण त्याला शक्य नाही.काहीही झाल तर आता तिच्याशीच लग्न करायचं.ती भेट मनात साठवून ओंकार कोल्हापूरला परतला.घरी आल्यावर त्याने आईला विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी तिला सांगून टाकल्या.आईने पप्पांना समजावून सांगण्याच वाचन दिल.त्यामुळे आता आईच्या शब्दांवर विश्वास ठेवून ओंकार निश्चिंत झाला.
इकडे पिंकी येणाऱ्या प्रत्येक स्थळाला नकारच देत होती.शेवटी वैतागून तिचे मामा ओंकारला भेटायला आले,ओंकाराने त्यांना "मला पिंकीशीच लग्न करायचे आहे" हे पटवून दिले मग शेवटी एके दिवशी पिंकीचे वडील ओंकाराच्या पप्पांना भेटले.आणि त्यांना ओंकार आणि पिंकीच्या लग्नाविषयी विचारलं.ओंकाराचे वडील म्हणाले,
"ओंकारला डिग्री मिळाली कि दोन महिन्याच्या आत लग्नाचा बर उडवून देऊ,तुम्ही निश्चिंत असा "
आतल्या रूममधून हे संभाषण ऐकणाऱ्या ओंकारला आता अत्यानंदाने वेड लागायचं बाकी राहील होत.शेवटी आईची शिष्टाई यशस्वी झाली होती.
आता वर्षभरातच दोघांच लग्न होईल.मला आमंत्रण मिळेल कि नाही कुणास ठाऊक पण लग्नात मी जाणार हे नक्की कारण त्याच्या लग्नात कदाचित मलाही एखादी "मोरपंखी " मिळून जाईल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा