ओंक्याला हे सुपरकुल,फब्युलस
आणि माइंड ब्लोइंग उत्तर कस सुचलं असेल ते त्याला अजूनही कळलं नाही(एरवी तोंडातून शब्द
फुटत नाही साल्याच्या ).पण या प्रश्नाने आणि उत्तराने दोघेही काय समजायचे
ते समजले.प्रपोज न करताच जेव्हा प्रेम मिळत तेव्हा तो आनंद अवर्णनीयच असतो.ज्या व्यक्तीला
आपण व्यवस्थितपणे भेटलो देखील नाही त्या व्यक्तीशी जेव्हा ट्युनिंग जुळत आणि ती व्यक्ती
आपली आहे अस जेव्हा मन सांगत तेव्हाच ते खर प्रेम असत.पिंकी आणि ओंकार या दोघानाही
ते इतक्या सहजपणे मिळालं आहे अस त्यांना वाटत होत.
" सांग "
क्रमश: ............................................
पण एवढ्या सहज तर आजकाल शिवाजी युनिव्हरसिटीचा एक्झाम फॉर्म देखील भरला जात नाही तर मग प्रेम तर
फार लांबची गोष्ठ आहे.त्या दोघांची खरी लढाई तर आतापासून सुरु होणार होती.प्रेम करणं
फार सोप असत पण ते निभावून नेण महाप्रचंड काम असत हे त्यांना आता कळणार होत.आणि आता
हे महाप्रचंड काम ओंकारला करायचं होत.असे मेसेज आणि फोन मध्ये दिवस सुखाने जात होते.आता
डिसेंबर उजाडला होतो.तिसऱ्या सेमिस्टरची परीक्षा ७ तारखेपासून सुरु होणार होती.ओंकार
परीक्षेच्या तयारीत गुंतला होता.पण इकडे पिंकीची अवस्था बिकट होत चालली होती कारण तिच्या
लग्नासाठी वर संशोधन प्रचंड वेगात सुरु होत आणि प्रत्येक येणाऱ्या स्थळाला ती नकार
देत सुटली होती.शेवटी घराच्या लोकांच्या इमोशनल प्रेशरला कंटाळून ५ डिसेंबरला तिने
ओंकारला फोन लावला आणि सारी परिस्थिती सांगून विचारलं,
"अरे, माझ्या घरी माझ्या लग्नाची बोलणी सुरु आहे,आपल्या
रीलेशनबद्दल घरी सांगू का?"
ओंकारासमोर आता फारच मोठ प्रश्नाचींह उभं राहील होत.कारण होय सांगितलं
असत तर मोठाच प्रोब्लेम होणार होता,त्याच शिक्षण पूर्ण झाल नसल्यामुळे घरात त्याच्या
लग्नाचा विचारदेखील नव्हता.आणि नको म्हटलं तर पिंकीच्या समोरचा अडचणींचा डोंगर
उभं होता.आता "आर या पार " या अट्टीट्युड ने त्याने उत्तर देवून टाकल,
" सांग "
(बिचाऱ्याकडे दुसरा
पर्यायच नव्हता म्हणा )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा