सोमवार, १३ ऑगस्ट, २०१२

इन्जीनियरांच्या लव्हस्टोऱ्या:सुश्याचं प्रेमपत्र(भाग 3)


                     मी ताडकन उभं राहिलो.हि वेळ येणार हे माहित होत पण येवढ्या लवकर येईल हि अपेक्षा मी काय कुणीच केली नव्हती.अंतर्बाह्य हादरने या लहानपणी शिकलेल्या वाकप्रचाराचा अनुभव  मला  आत्ता पहिल्यांदाच येत होता.बिचाऱ्या सुश्याचा चेहरा सारखा समोर येत होता आणि या धक्क्यातून स्वत:ला कसाबसा सावरून घेत होतो तोच शेजारी बसलेल्या उम्याने स्वत:च्या मंद,मूर्ख आणि अतिशहाण्या  स्वभावाला अनुसरून प्रश्न विचारलाच,
                   "कुणाशी?"
                   "घुमे सरांशी!"
                     प्रमाणापेक्षा जास्तच लाजत फुगा उत्तरली.हे तीच उत्तर ऐकून आत्ताच्या आता हि धरती दुभंगावी आणि तिने मला पोटात घ्यावं असं वाटल नाहीतर कमीत कमी पुढच्या भिंतीवरून उडी टाकून जीव द्यावा अशी इच्छा मनात उफाळून आली.पण माझ्या आईला नातवंडांचा चेहरा पहायची इच्छा असल्याने मी स्वत:ला आवरलं.या सलग दोन धक्क्यातून सावरायच्या आतच फुगा माझ्या नावाची पत्रिका देऊन निघूनही गेली होती.
                    पंधरा मिनिटानंतर सावरलो,पण हे कस घडल याचा विचार करू लागलो.मग तिच्या काही मैत्रीण आणि माझे स्टाफरूम मधील सोर्स वापरून मिळालेल्या त्रोटक माहितीच्या आधारे जेव्हा वस्तूस्थितीच  जे काही चित्र उभं राहिलं तेव्हा तर  मी बेशुध्द पडायचा बाकी राहिलो होतो. खरी गोष्ट अशी होती कि,सुश्याने जेव्हा  टयुटोरीअलमधून प्रेमपत्र फुगला तील तेव्हा तिने ते उतरून उतरून काढलं पण ते लिहिताना "सबमिशन करताना त्यातील माहित हि गोपनीय आहे असे समजून मी ती कधीच वाचणार नाही "या इंजिनियरिंग स्तुडंतच्या प्रतीत्नेची तिने पुरेपूर आठवण ठेवली होती.आणि सुश्याच ते दोन पाणी प्रेमपत्र उतरून काढताना त्यातील एक अक्षरही वाचण्याचा त्रास तीन आपल्या अवजड शरीराला दिला नाही . आणि लिहून झाल्यावर ते घुमे सरांना सबमिट केल.आणि सरांनी आपल्या महाखडूस,महा........,महा............. (teacher's day जवळ आला असल्याने शब्द आणि भावना आवरल्या आहेत )स्वभावाला अनुसरून तीच एक ना एक अक्षर वाचून काढलं आणि त्या पत्रात नावं नसल्याने गैरसमज करून घेतला.त्यावेळी नक्की काय झाल असेल माहित नाही पण नक्कीच हा माणूस मायकल  ज्याक्सनचा  बाप बनून नाचला असणार हे नक्की! कारण अभ्यास करून पडलेल टक्कल ,रात्री जागरणं करून(कशासाठी जागत असेल हे कृपया विचारू नका ) डोळ्याभोवतीची वर्तुळ आणि जरा जास्तच शिकल्याने लग्नाचं उलटून गेलेलं  वय असं तगड आणि रुबाबदार व्यक्तिमत्व असलेल्या माणसाला अशावेळी हर्षवायू होणे स्वाभाविकच आहे.
                     मग काय! घुमे सर आपला सारा गोतावळा घेऊन फुगाच्या घरी हजार झाले.आणि सोयरिक जमवूनच बाहेर पडले.कारण ५०,००० पगाराचा जावई मिळन तसं भाग्याचाच लक्षण.म्हणून फुगाच्या वडिलांनी लगेच होकार कळवू टाकला आणि एवढा वेल सेटल(कि मेंटल)  नवरा मिळाल्यामुळे फुगाच्या नकाराचा प्रश्नच नव्हता.अश्या प्रमाणे फुगाच लग्न सरतेशेवटी ठरलं,घुमे सराच्या चेहऱ्यावरील आनंद कारंज्याप्रमाणे फुटून येत होता खरतर त्यांना हसताना आम्ही सगळे पहिल्यांदाच पाहत होतो..
                   आता हसावं कि रडावं हेच समजेनास झाल म्हणून शांतपणे बाहेर पडलो,सागरच्या दुकानातून दोन पाकीट घेतली,मोबाईल वर देवदासची गाणी डाऊनलोडीन्ग्ला टाकली आणि सुश्याची समजूत कशी काढायची या विवंचनेत त्याच्या रूमकडे चालू लागलो.........................

1 टिप्पणी:

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
HTML Comment Box is loading comments...