शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१२

वेदना

                           वेदना हि एक असामान्य शिक्षक असते. (pain is a excellent teacher).हे  वाक्य मी लहानपणी कुठतरी वाचलं होत.  कदाचित वयामुळे असेल किंवा या वाक्याचा अर्थ कळला नाही म्हणून फार काळच ती शिकवण विस्मृतीत गेली होती. 
                           पण आता सगळाच स्पष्ठ समजून येतंय. आणि अनुभवपण येतोय. एक गोष्ट माझ्या छोट्याशा आयुष्यात मला लक्ष्यात आली आहे ती म्हणजे बहुतांश लोकांना वेदनेपासून,दुखांपासून पळून जाणेच सोयीस्कर वाटते. वेदना या नकोश्या वाटतात. त्यांचा    आपल्या आयुष्याशी संबंध येऊ नये म्हणून प्रत्येकजण जपत असतो. ह्या गोष्टींचा तिरस्कार केला जातो.  मी मात्र या गोष्टींकडे जरा वेगळ्या पद्धतीने बघतो. मला नेहमीच वेदनेची गरज वाटते,वेदना हि माझी प्रेरणा आहे.माझ्या आयुष्यात वेदना नसती तर मी आज जो आहे त कधीच नसतो,म्हणून मी नेहमीच तिचा उपकृत असतो.
                         एकदा कॉलेजमध्ये कशाबद्दल तरी तक्रार करत असताना नांगरे सरांनी मला एक गोष्ट सांगितली होती. ''गरुडाची गोष्ट '',ते म्हणाले होते कि गरुडांच आयुष्य हे ८० वर्षाचं असत पण बहुतांश गरुड हि ४०व्या  वर्षांपार्यांतच जगतात. त्याच कारण असत कि ४०व्या  वर्षी त्यांच्या शरीरात अनेक बदल घडून येत असतात. गरुडाची चोच बोथट होत असते,त्यांच्या नख्या वाढतात आणि त्यांचे पंख झाडून जातात.या काही महिन्यांच्या कालावधीत त्यांना कोणताही आहार मिळत नाही. त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. जिवंत  राहण्यासाठी त्यांच्याकडे एकाच अघोरी उपाय असतो,त्यांना दगडावर आपटून आपली चोच तोडून टाकावी लागते, आपले उरलेसुरले पंख घासून काढावे लागतात. या वेदनेतून आणि संघर्षातून जो वाचतो तोच खरया अर्थाने जगण्यास लायक  ठरतो.त्याची वेदना त्याला नव्या आयुष्याची भेट बहाल करते.जेवढ्या जास्त हलापेष्ठ सहन कराल तेवढा जास्त फायदा होईल,  हाच सिद्धांत डार्विनने मांडलाय.
                            आज आजूबाजूला पाहिलं तर या गोष्टीचा लोकांना विसर पडलाय हे लगेच दिसून येईल. जेव्हा मी लोकांना आपल्या मुलांना आयुष्यभर आपल्याच  पदराखाली घेवून बसलेले पाहतो तेव्हा हि जाणीव अधिकच गडद होत जाते.आपण आपल्या मुलांना किती दिवस या सर्वापासून दूर ठेवणार आहोत? कधीतरी त्यांना या सर्वांचा सामना कराव लागणारच हि वस्तुस्थिती हे लोक नाकारताच असतात. आणि म्हणून हि मुल कधीच कणखर बनू शकत नाहीत. कारण त्यांच्या आईवडीलानी त्यांना कधीच ह्या शब्दाचा अर्थ कळू दिलेला नसतो.म्हणून  ज्याप्रमाणे आपली पूर्वजांची  शेपटी  नष्ट  झाली त्याप्रमाणे परिस्थितीशी लढण्याची आपली निसर्गदत्त देणगी आपण हरवून बसू अशी भीती मला नेहमीच वाटते    
माझ तर अस ठाम मत आहे, कि वेदना हि आपली एक जिवाभावाची मैत्रीण असते, ती आपल्या जवळ आयुष्यातील सगळ्यात कठीण आणि दुखद प्रसंगापासून सोबत करीत असते,त्या प्रसंगातून परत उभं राहण्याची प्रेरणा देत असते,ती आपल्या मनात सतत संघर्षाची ज्योत जागृत ठेवत असते.या मार्गावर आपली सोबत करीत असताना ती कधीही ध्येयाचा विसर पडू दात नाही.
                          तिची साथ असेल तरच अशक्य कोटीतील कामे शक्य होऊ शकतात.जगातील मोठमोठ्या लोकांना तिनेच घडविले आहे. म्हणून म्हणतोय तिच्यापासून पळू नका तिला आपली माना  तिच्यापासून प्रेरणा घ्या,ती तुम्हाला साथ देऊन तुमचा अनुभव आणि जीवन समृद्ध करण्यास मदत करेल.
                          तुमच्या आयुष्यात वेदना नसेल तर मात्र तुम्ही सामान्यच राहाल, कारण असामान्य गोष्टी करण्याची गरज तुम्हाला वाटणार नाही.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
HTML Comment Box is loading comments...