"सुश्या
फुगाला प्रपोज करणार"
हि बातमी संजीवनच्या होस्टेलमध्ये वणव्यासारखी पसरली.सुश्याच्या नेभळटपनाकडे बघून आणि त्याचा पूर्वेतिहास माहित असल्याने मी तिकडे फारसं लक्ष दिलं नाही.पण त्याला भेटून त्याचा रागरंग त्या बातमीवर विश्वास ठेवावाच लागला.
क्रमश...................
हि बातमी संजीवनच्या होस्टेलमध्ये वणव्यासारखी पसरली.सुश्याच्या नेभळटपनाकडे बघून आणि त्याचा पूर्वेतिहास माहित असल्याने मी तिकडे फारसं लक्ष दिलं नाही.पण त्याला भेटून त्याचा रागरंग त्या बातमीवर विश्वास ठेवावाच लागला.
कॉलेजच्या शेवटच्या वर्षीतरी ती
आपल्याला 'हो' म्हणेल या भोळ्या आशेपोटी हा बहाद्दर हे नसतं धाडस करतोय हे
मला कळून चुकल.खरतर आमचा सुश्या आणि फुगा दोघेही कॉलेजमध्ये प्रचंड फेमस!
अभ्यासात सतत टोप केल्यामुळे सुश्या आणि आपल्या जरा जास्त नखर्यामुळे फुगा
कॉलेजमध्ये प्रचंड फेमस झाले होते. फुगाच हे जगावेगळ नाव आम्ही पोरांनी
पाडलं होत, कारण फस्ट यीअरला चवळीच्या शेंगेप्रमाणे असणारी फुगा जेव्हा
मेसचं जेवण जेवून जेवून जेव्हा हळूहळू फुगू लागली तेव्हा कम्परीझनसाठी
आम्हाला दुसरा शब्दच सापडला नाही.मेसमध्ये तिला जेवताना बघून जगात २५ कोटी
भूकबळी आहेत याची खात्री पटायची,आणि ते का आहेत याचं कारणदेखील समजून
यायचं.सुश्याला फुगात काय आवडल हे माहित नव्हत पण या वयात गाढवी पण
अप्सरेसारखी दिसते हे समजून आलं होत.
तर अस हे कपल कॉलेजमधल्या
इतर कपल्सपेक्षा जरा वेगळ होत,कारण हे एक सिझनल कपल होत,ह्यांच्या
दोस्तीचा सिझन फुगाच्या गरजेवर अवलंबून असायचा.म्हणजे सबमिशन
,प्रोजेक्ट,टयुटोरीअल अशावेळी दोघे हमखास एकत्र दिसायचे.पण जेव्हा या
गोष्टी नसतील तेव्हा या दोघांतील अंतर मोजायला कोनात इंस्तृमेंट वापरावं हा
यक्षप्रश्न आम्हाला पडत असे.कदाचित प्रेमाच्या भरती ओहोटीचा हा प्रकार
असेल म्हणून आम्हीही तिकडे दुर्लक्ष करायचो.तरस हे सिझनल कपल अजून कन्फर्म
नव्हत त्याच महत्वाच कारण म्हणजे नेभळट
स्वभाव.एरवी तीन तीन तास गप्पा मारणाऱ्या सुष्याला ती तीन अक्षर
उच्चारायला तीन वर्षात एकदापण जमल नव्हत.म्हणूनच गेले तीनही valentine day
स्वत:ला बाथरुममध्ये कोंडून घेणारा सुश्या हा valentine day गाजवेल अशी कुणाचीही अपेक्षा नव्हती.पण आता हि बातमी ऐकून "आज कूच तुफानी होगी " हे मी ताडलं.
प्रेमाचा प्रक्टिकल अनुभव शून्य असूनही थिअरीत प्रचंड विद्वान असणारे बुद्धीजीवी इन्जीनियर सुश्याच्या रुममध्ये न बोलविता फुकटचा सल्ला द्यायला जमा झाले.अगदी शोलेपासून थ्री इडीयटच्या प्रपोज स्टाइलवर
विचार करणे सुरु झाले.पण कॉलेजजवळ कुठेच पाण्याची टाकी नसल्याने आणि
त्यातही सुष्याला उंचावर चक्कर येत असल्यामुळे शोलेचा ऑप्शन बाद झाला.थ्री इडीयट प्रमाणे गर्ल्स होस्टेलवर जाण्याचा बेत सुश्याने सांगितला पण गर्ल्स होस्टेलच्या वोचमनच्या हातात हा सापडला तर याचं काय होईल या काळजीपोट आम्ही त्याचा हा बेत हाणून पाडला.कारण हा वोचमन खली चा दुरून नातेवाईक लागतो असं आमच्या कानावर आलं होत.आणि त्याची अगडबंब शरीराकडे भागून ऐकणाऱ्याला ते पटायचं देखील.
शेवटी जगन्नाथाने दिलेला प्रेमपत्र
लिहिण्याचा सल्ला सर्वांनी उचलून धरला.खरतर हा मार्ग आउटडेटेड असला तरी
निर्धोक आहे आणि सुश्यला मार बसण्याची शक्यता फारच कमी असल्याने आम्ही याला
मान्यता दिली.प्रेमपत्र कस लिहायचं आणि कस पोचवायच हे प्रश्न आता समोर उभे
होते.पहिला प्रश्न इंद्रजीतने लगेच सोडविला आणि गुगल वर love-letter असं टाइप करताच ७०००० रिझल्ट आले,मग सुश्याने टेबलवरील जर्नल पेपर उचलला आणि इमानदार इन्जीनियरिंग
स्तुडंटप्रमाणे कॉपी करायला सुरुवात केली.शेवटी कसाबस त्याचं ते तीन पाणी
फर्ड्या इंग्लिश मधील प्रेमपत्र तयार झालं.आणि मग शेवटी दिपकने दिलेला
दोघांचाही नाव न टाकण्याचा सुरक्षित सल्ला मान्य करून तो ते पत्र पोचवायला
तयार झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा