फर्स्ट यिअर सुरु झाल एकदाच.नवे चेहरे,नवे मित्र(मैत्रीनीसुदधा),नावे चेहरे,सगळच नव नवीन वाटू लागलय.मरगळलेल्या कोलेज मध्ये नवीन चैतन्य भरून आल्यासारख वाटत.त्यांच्या चेहऱ्यावरील आश्चर्य,त्यांच्या डोळ्यातील स्वप्ने कुठेतरी ओळखीची वाटतात.त्यांच्या मनातील भीती तर स्वत:चीच आठवण आणून देते.तीन वर्षापूर्वी आपण कसे होतो याची आठवण आपसूकच जागी झाली. यांच्या शंका आणि यांचे प्रश्न हसून हसून पोट दुखविणारे असतात पण ते विचारण्यामागची त्यांची निरागसता काही लपत नाही.
नुकतेच बारावी आणि CET च्या चरख्यातून मुक्त झाल्यामुळे झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यातून पदोपदी दिसून येत होता."आता सुटलो एकदाचे" हा भाव त्यांच्या प्रत्येक हालचालीतून दिसून येत होता. त्यांच्या मनात हजारो स्वप्ने उसळी मारतायत हे त्यांच्या चेहऱ्यावरून सहजपणे दिसून येत होत.पण काही दिवसात हा आनंद लोपनार हे आम्हाला माहित असल तरी या सगळ्याची जाणीव त्यांना करून देण्याचं धाडस आम्हाला झालं नाही कारण स्वप्न चुरगाळल्यावर काय होत हे आम्हाला माहित होत म्हणून जर वाट लागणारच आहे तर मग एवढी गडबड कशाला करा ह्या अट्टीट्युडने आम्ही गप्प बसून तो ओसंडून वाहणारा उत्साह पाहण्यातच समाधान मानलं.
पण ह्या फर्स्ट यिअर पेक्षा खरे उत्साही तर आमच्यातले काही हौशी कलाकार होते(विशेषत: मेक बॉयज).फर्स्ट यिअरच्या कुठल्या क्लास मध्ये किती चांगल्या मुली यापासून ते या वर्षातील सर्वात सुंदर मुलगी (लेखनमर्यादा जाणाव्यात खरा शब्द दुसरा आहे) हा किताबाची मानकरी ठरवली जाते.एकमेकांच्या वहिन्या ठरविल्या जातात(हे फक्त ठरविण्यापुरतच मर्यादित असतं कारण करण किती अवघड आहे हे सर्वांनाच माहित झालेलं असतं ).
आता नव्याचे नऊ दिवस संपतील आणि हे नवीन दोस्त कधी इंजिनियरिंगच्या रंगात रंगून जातील हे कळायचंदेखील नाही.आता यांच्यातूनच मग नवे इंजिनियर निर्माण होणार आहेत यांचे पण किस्से ऐकायला मिळतील,यांच्यापण लव्हस्टोरया बनतील आणि हे पण मग या कॉलेजमधून बाहेर पडतील.& a circle will complete again....................................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा