बुधवार, २२ ऑगस्ट, २०१२

माझ्या त्या साऱ्या कविता

कधीतरी बसतो असाच एकटाच लिहित 
मग कविता येते फुलून माझ्या वहीत 
सागराला मिळेल जेव्हा माझ्या जीवनाची सरिता
सोबत करतील मला तेव्हा माझ्या त्या साऱ्या कविता

वार्धक्याच्या त्या ओसाड रानात 
तारुण्य भेटेल मला पुन्हा कवितेच्या रुपात
निराशेने  त्या अंधारलेल्या  मनात 
कविता देतील मला आशेची खैरात

काहीही झाल तरी त्या माझ्याच असतील
पडलो झडलो तर मला सावरतील
उन,वारा ,पावसात मला जपतील
शेवटपर्यंत माझ्याशी त्या एकनिष्ठ राहतील

एखादी हसवेल,एखादी रडवेल
तो आनंद अन ती वेदना माझीच असेल
हक्क असेल माझाच कवितांवर साऱ्या 
जग मला विसरल्यावर सोबती होतील त्या खऱ्या

सरणावर पडलो तरी डोक्यात सदा फिरत राहतील
मरणावरही माझ्या त्या चार अश्रू तरी ढाळतील
मेल्यानंतरही त्या मला जिवंत ठेवतील
माझ्या त्या साऱ्या कविता माझ्या मरणाला अर्थ मिळवून देतील 

                                .............................................निखील माने 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
HTML Comment Box is loading comments...