शुक्रवार, २७ जुलै, २०१२

निकाल

                          "निकाल लागला" हे दोन शब्द एकले कि जगबुडी झाल्यासारखं वाटत.हातातलं पुस्तक,फुटबॉल आणि असेल तर गर्लफ्रेन्डचा हातही सोडu पावलं कॉम्पुठरकडे धाव घेतात.(माझ्या हाती अशा वेळी नेहमी फक्त पुस्तकच असत ).
                           धडधडत्या हृदयाने आणि थरथरत्या हाताने न धड पासवर्ड आठवतो आणि न धड बटन सापडतात.कसातरी कॉम्पुठर चालू करून unishivaji.ac.in हि अक्षरे टाईप होतात आणि परीक्षा क्रमांक टाकून एनटर केलं कि मग मात्र सुरु होते loading...........loading...........loading.......................अर्ध मिनिट ,फक्त हे अर्ध मिनिट प्रचंड तणावाच असतं,यातलं टेन्शन व्यक्त करण्यापलीकडे असते. एका सेमची मेहनत,अभ्यासासाठी जागविलेल्या रात्री,आई वडिलांच्या अपेक्षा ,कॅम्पस enterview बद्दलच्या आशा हे सर्व डोळ्यापुढे slide शो प्रमाणे सरकत जाते.हृदयाची धडधड इतकी वाढते कि होस्टेलच्या गेटवर उभ्या वोचमन पण एकू जाईल.
                             मग ते रिझल्टच सोनेरी पान लोड होत,आणि मग काहींचा निकाल लागतो आणि काहींचा "निकालच" लागतो.निकाल लागणारे खुश होतात ,ज्यांनी top केलाय ते खुश ,ज्यांना फर्स्ट क्लास मिळालाय ते हि खुश आणि जे काठावर पास झालेत ते टर सगळ्यात जास्त खुश.आपला रिझल्ट पहिला कि मित्रांची आठवण येते,मग इतरांचे  रिझल्ट पहिले जातात. हा  topper आहे,त्याला first class मिळाला,त्याचे दोन विषय राहिले वगैरे.......वगैरे..........वगैरे.............................यातूनच जुन्या नव्या topper लोकांची भांडण ठरलेलीच असतात.मग त्या भांडनाविषयी आणि मार्कांविषयी रात्रभर स्टेटस अपडेट होत राहत. आणि सोबतीला अभिनंदनाचे आणि सांत्वनाचे फोन येताच राहतात.इतक्या दिवसाचं टेन्शन,प्रेशर एका मिनिटात रिलीज होऊन जात. हलक वाटू लागत.
                           दुसरा दिवस सरांना मार्क्स सांगून कौतुक करून घेणे,जुन्या नव्या topper लोकांची भांडण  मिटविणे (actually enjoy करणे )आणि दोन लेक्चर झाल्यावर पळून जाऊन पार्टी करणे यात संपतो.(आम्ही या वेळी पन्हाळ्यावर गेलो होतो ) आणि अशा तर्हेने  रिझल्टचा सहामाही सन साजरा होतो.आणि मग पुढच्या सन चांगला साजरा करण्यासाठी तयारीला लागायचं. खरतर आता पूर्वीसारखे  रिझल्ट आधी सांगून लागत नाही ते एक बर आहे. कारण कुणालाही काही माहित नसताना अचानक जेव्हा  रिझल्ट लागतो तेव्हा जो शॉक बसतो तो एकदम अमेझिंग असतो.आणि तो धक्का पचायच्या आत नवा शॉक बसणार असतो.
                            खरतर आता हे शॉक परत बसणार नाहीत कारण आता परीक्षेशीच णाळ  तुटणार तिथे  रिझल्ट चा दुरान्वयेही संबंध येईल का नाही कुणास ठाऊक. 
तर मग या रिझल्टची नशा आताच एन्जोय करुत..................................... 
by the way,मी पास झालोय बऱ्या मार्कांनी :-)

गुरुवार, २६ जुलै, २०१२

झोंबी

                                परवा लायब्ररीच्या मराठी सेक्शन मध्ये  झोंबी सापडली. कव्हर बघून एखादे आत्मचरित्र वाटले पण वाचायला सुरुवात केल्यावर समजले कि हि तर एका अपूर्व वेदनेची गाथा आहे.                                                                                                                                                                 कालच  "झोंबी" वाचून खाली ठेवली.डोक सुन्न झाल. आज आम्ही किती lucky आहोत.शिक्षण मिळविण्यासाठी कुणी एवढ्या यातना सोसल्या असतील हि कल्पना पण करवीत नाही.शाळेत घवघवीत यश मिळवून पण चाबकाचा मार जर आम्हाला मिळाला असता तर आमच काय झाल असत याची कल्पनापण करावीत नाही. 
                                  आन्दाची शिक्षणासाठीची तळमळ मनात ठासून जाते.त्याची स्वप्ने त्याच्या बापापेक्षा वेगळी असतात.त्याला शिक्षणाची ओढ होती पण त्याला ते मिळत नव्हत,यातूनच त्याची वेदना जन्माला आली, त्या  वेदनेतून त्याने त्याची कविता साकारली,आणि जन्माला आला मराठीतला एक कवी "आनंद यादव "
                                  गरिबी म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल  तर "झोंबी" नक्कीच वाचा आणि आपल्या बापाला शिव्या देवून त्याचा वाइटपनाचा उद्धार करणाऱ्यांनी तर हे पुस्तक नक्कीच वाचावे कारण एखादा बाप किती वाइट असू शकतो हे जर जाणून घ्यायचं असेल तर आनंद यादवांनी चितारलेला "दादा"वाचलाच पाहिजे. आडमुठेपनाच सगळ्यात इरसाल उदाहरण म्हणजे आन्दाचा बाप,त्याची एक वेगळीच "philosophy " होती, शिक्षण म्हणजे मुलं वाया घालविण्याची जागा हे त्याच प्रामाणिक मत. दहा बारा पोर होवूनही हे देवाची देणगी असा त्याच मत,मग भले पोर उपाशी राहून मेली तरी याच  त्याला काही सोयरसुतक नाही.      झोबीचा नायक जरी अन्दा असला तरी त्याचा बाप मात्र जास्तच भावला. 
                                 परिस्थितीशी झगडणारा नायक फार वेळा वाचलंय, पण आनंदा फारच जवळचा वाटला 
त्याची झोंबी जरा जास्तच झोंबली .

शुक्रवार, १३ जुलै, २०१२

शेवटच्या वर्षी

                                                        आज परत एक लेक्चर झाल,विषय काय नेहमीचाच ,''शेवटच्या वर्षाला आहात ,करियरची काही तरी काळजी करा नाहीतर आयुष्याची वाट लागेल ''.हे वाक्य शंभरदा एकूण डोके  फिरायची वेळ आली होती  .नाही तसं पाहिलं तर  हा विषय फार गंभीर आहे हे मान्य ,पण कितीवेळा ऐकायचं  हे ?म्हणून ऐकूनही या कानातून एकूण त्या कानातून दरवेळी सोडली.
                                                      एखादी गोष्ट चार वेळा जरी सांगितली तरी कळते आम्हाला पण इथे तर जो तो येतो  आणि टपली मारून जातोय.जणू काही आमच्या  भवितव्याची आम्हाला काही काळजीच नाही.मला हे म्हणायचं नाही कि कुणी आम्हाला काही सांगूच नका ,पण माझं म्हनन एवढच  आहे कि जरा  आमच्पण म्हनन ऐका,खरच आम्ही आमच्या करियरबद्दल सेरियस  नव्हतो ?आज आम्हाला इंजिनियर म्हणजे  काय हे  कळायच्या आधी आम्हाला  इंजिनियरिंगच्य अडमिशानाचे फॉर्म भरावे लागतात,आणि  कसातरी सर्व आणि प्रक्रिया पार करून कोलेजच्या आवारात पोचतो न पोचतो तोच मार्कांच्या रेस मध्ये ओढले जातो,पाच तास कोलेज,दोन तास क्लास,तीन तास सबमिशन,तासभर प्रवास यात दिवस आणि  प्रक्टीकॅल्स,टेस्ट,परीक्षा यात एकामागून एक वर्ष मुठीतल्या वाळूप्रमाणे संपून जातात आणि मग कधी करू करियरचा विचार?.बर आजकाल इथे फक्त मार्क असून भागात नाही, soft स्किल पण पाहिजेत,त्यासाठी इतर activities करा. पण या rat race मधून  वेळ कुणाला आहे.चार वर्ष राबा आणि बाहेर आल्यावर आम्हाला काही किंमतच नाही. 




                                                        थकवलय पार या इंजिनियरिंग.आता शेवटच्या  वर्षी अडमिशनच्या  वेळेची स्वप्न आता बासनात गुंडाललीत,सबमिशसाठी जगलेल्या रात्री निरर्थक वाटतायत.आता जगाच्या नकाशात स्वताच स्थान शोधायचं आहे ,स्वत:च्या हिमतीवर ...............................                
                
                

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
HTML Comment Box is loading comments...