मंगळवार, १६ एप्रिल, २०१३

निरोप समारंभ

      परवा आमचा निरोप समारंभ होता . "First Batch of SETI" आमच्या नावाला हे बिरुद गेले चार वर्षे चिकटून होत. तसे आम्ही पहिले असल्याने आम्ही सार्या कोलेजचे प्रचंड लाडके होतो. 
         आमचे चेअरमन भोसले सरांच्या मनात  आमच्यासाठी एक सोफ्ट कॉर्नर होता . पन्हाल्यासारख्या ठिकाणी कॉलेज असल्यामुळे येथे फारच मजा यायची . 

      इथिल सर्व शिक्षकांनी आमच्यावर खरच खूप प्रेम केलं, आम्हाला प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन केलं आम्हाला संकटांना तोंड द्यायला शिकविल . थरकार सर  ,देशमुख सर ,कोळी सर  ,नांगरे सर  ,कुलकर्णी सर ,मोहिते ,देसाई सर या आणि अशा कित्येक शिक्षकांनी आमच्या पाठीशी उभे राहून आम्हाला साथ दिली . त्यांचे  मानावे तितके थोडेच आहेत . 

      चार वर्ष कशी सरली हे अजूनही कळत नाही . अजूनही वाटतय कि फार कमी वेळ मिळाला या कॉलेजमध्ये . चार वर्षात खर तर फार आठवणी जमा झाल्यात काही चांगल्या काही वाईट . चांगल्या आठवणी आज ओठावर हसू आणतायत तर वाईट आठवणी अजूनही सलातायत . पण as usual वाईट आठवणी इथेच सोडून चांगल्या आठवणींची शिदोरी घेऊन आता पुढे जायला हव.  

     निरोप समारभानंतर कित्येकांच्या डोळ्यात पाणी आलं होत.मित्रांना सोडून जाण्याच्या कल्पनेनच गलबलून येतय. चार वर्षांचा सहवास ऋणानुबंध सार काही सोडून आता पुढ जायचं आहे.  हे सर्व करताना खरतर जीवावर येतंय पण काय करणार we must move on.

     इथून गेल्यावर या सगळ्यांची फार आठवण येईल . आता इथून पुढे आयुष्यात नवे मित्र नक्की मिळतील पण संजीवांमधील मित्रांची बातच काही और आहे. 

                     या सर्वांची खूप आठवण येईल . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
HTML Comment Box is loading comments...