मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१२

इन्जीनियरांच्या लव्हस्टोऱ्या:मोरपंखी (भाग १ )

                          इंजिनियरिंग स्टूडंटस मध्ये इंजिनियर कमी आणि प्रेमवीरच जास्त सापडतील.अशाच एका प्रेमवीराची हि कहाणी.इन्जीनियरांप्रमाणे त्यांच्या लव्हस्ठोर्यादेखील भन्नाट आणि एकदम वेगळ्या असतात. तसं पहायला गेलं तर हे स्वाभाविकच आहे म्हणा.पण अस्वभाविकारीत्या मागच्या वर्षी यामध्ये आणखी एका मेक बॉयची भर पडली,"ओंकार चव्हाण" हे संजीवनच्या मेक ब्रांचमधील एक मोठ आणि वजनदार प्रस्थ.(वजनदार म्हणजे याच्या शब्दाला मोठ वजन आहे आमच्या ब्रांचमध्ये ).काही लव्हस्टोऱ्या या हसवून डोळ्यात पाणी आणतात तर काही रडवून ओंकार आणि पिंकीची लव्हस्टोरी मात्र प्रेरणादायी प्रकारात मोडते.(मोटीवेशनल).ह्या दोघांची लव्हस्टोरी एकूण तर आमच्या कोलेजात कित्येकांना प्रेरणा मिळालीय( मलापण ).ह्यांची प्रेमकहाणी ऐकल्यावर ८० च्या दशकातील चित्रपटांची आठवण येते.तर आता आणखी जास्त प्रास्ताविक  न सांगता मी मूळ मुद्द्यावर येतो.
                          २८ मे २०१० पर्यंत प्रेम या गोष्टीवर अजिबात विश्वास न ठेवणारा ओंकार आपल्या ताईच्या लग्नाच्या तयारीत गुंतला होता.नेहमी प्रेम या गोष्टीची चेष्टा करणाऱ्या बिचाऱ्या ओंक्याला येत्या २४ तासात आपणही कुणाच्या तरी हृदयात नजरबंद होऊ याची पुसटशी देखील कल्पना नव्हती. २९ मे उजाडला आणि आपल्या लाडक्या , एकुलत्या एक बहिणीच्या लग्नात  ओंक्याने स्वत:ला सगळ्या तयारीत झोकून दिले होते.लग्न धुमधडाक्यात होत होत.लग्नात मानाचं असणारं " करवला " हे पद त्याच्याकडे असल्यामुळे वरपक्षाच्या बाजूकडे त्याची नजर सराईतपणे भिरभिरत होती.आणि इतक्यात त्याची नजर एका मोरपंखी रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेल्या मुलीकडे गेली.आणि मग काय विचारता "दिल कि घंटी बज गयी" त्या मोरपंखी रंगात ती प्रचंड सुंदर दिसत होती,(तशा लग्नात साऱ्याच मुली सुंदर दिसतात म्हणा,अर्धा किलो मेकअप केल्यावर दुसर काय होणार.)हा तर अश्या या स्वप्नातल्या परीजवळ ओंक्या आला आणि पाठीमागे गान सुरु झालं,
                        "पहला पहला प्यार है,पहली पहली बार है "

                        आता  ओंक्याला तिच्यात माधुरी आणि आराश्यात सलमान दिसू लागला होता.
                       गेले  पंधरा दिवस लग्नातलं प्रत्येक काम नीट करणाऱ्या ओंक्याच्या हातून आता चुका होऊ लागल्या होत्या,दाजींच्या बुटाऐवजी जेव्हा त्याने ताईच्याच चपला चोरल्या तेव्हा ते कुणाला कळलं नाही पण लग्नात जेव्हा तांदळाच्या ऐवजी साखर वाटू लागला तेव्हा मात्र सगळ्या मांडवात हास्याची लाट उसळली.पण काम करून दमला असेल बिचारा या सबबीखाली त्याला माफ करण्यात आला. खरी मजा तर पुढेच आली जेवण वाढताना.लग्न झाल्यावर ओंकारराव जेवणाच्या पंगती वाढू लागला.त्या मोरपंखीला आम्रखंड आवडत अस दिसून आल्यावर त्याने आम्रखंड वाढायला घेतलं.बायकांच्या पंगतीत २० वेळा वाढून झालं तरी हा तिथच ऊभा.त्या मोरपंखीच्या शेजारी बसलेल्या काकुना वाढताना त्यांच्या ताटात भातापेक्षा आम्रखंड जास्त झालंय आणि त्या काकूंना डायबेटीस आहे हे कळताच मात्र त्याने तिथून काढता पाय घेतला.



क्रमश...................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
HTML Comment Box is loading comments...