बुधवार, ९ ऑक्टोबर, २०१३

हो ची मिन्ह भाग ५

                 दक्शीन व्हिअतनामच्या संरक्शनासाथी हजारो अमेरिकन सैनिक व्हिअतनाम मध्ये येवु लागले, अमेरिकेने नेमलेल्या दिएम ने जनतेवर प्रचंड अत्याचार केले हे अत्याचार एवदे विकोपाला गेले कि शेवटी त्याचाच सैन्यधिकार्यानी त्याचा खुन केला.यानन्तर दक्शीन व्हिअतनाममधे लश्करी सत्तेचा अंमल चालु ज़ाला.याच कालावधीत हो चे उत्तर व्हिअतनामी लश्कर,व्हिअतमिन्ह संघटना आनि दक्शीन व्हिअतनाममधील सर्व बंडखोर मिऴुन गनिमी काव्याने  दक्शीन व्हिअतनाम लश्कर आनि अमेरिकेच्या भादोत्री सैन्यशी लडत होते.या सर्व विरोधकाना अमेरिका "व्हिअतकोन्गी"असे सम्बोधीत असे.हे सर्व व्हिअतकोन्गी अमेरिकेला जेरीस आनीत होते.हे लोक दिवसा खंदक खनुन लपुन राहत आनि रात्री अचानक अमेरिकन आनि दक्शीन व्हिअतनामी लश्करावर हल्ले करत.
                                                        व्हिअत कॉंगीचे भूमिगत खंदक 

                 जमिनीवरील युद्धात ही दोन्ही सैन्ये तुल्यबऴ होती पन आकाशात अमेरिकन वायुदलाचे निर्वीवाद वर्चस्व होते कारन उत्तर  व्हिअतनामकडे विमाने जवऴपास नव्हतीच,त्यामुऴे  अमेरिकन विमानांना आकाश मोकऴेच होते.विमाने वर बेफ़ाम बोम्बहल्ले करत असत.

                                  अमेरिकेचा पाशवी बाँब वर्षाव

 दुसर्या महायुद्धात दोन्ही पक्शानि मिऴुन जेवधे बोम्ब टाकले नसतील तेवडे बोम्ब उत्तर व्हिअतनामवर टाकन्यात आले.पन या सर्व परीस्थीतही उत्तर  व्हिअतनामची जनता हो च्या नेत्रुत्वाखाली खम्बीरपने उभा रहिली.१९५४ ते १९७४ या २० वर्शात अमेरिकेने आपला पैसा
,सैन्य या सर्वांचा अक्शरश भडीमार केला तरीही अमेरिकेला हे युद्ध जिंकता आले नाहीच पन उल़ट हो च्या नेत्रुत्वाखालील उत्तर व्हिअतनाम हऴुहऴु सायगाव कडे म्हनजे दक्शीन व्हिअतनामच्या राजधानीकडे सरकत होता.शेवटी १९७५ ला  सायगावचा ताबा घेतला आनि अमेरिकेला काडता पाय घ्यावा लागला.कित्येक वर्शानन्तर व्हिअतनामचे एकिकरन ज़ाले.पन त्या आधीच ३ सप्तेंबर १९६९ ला हो ची प्रानज्योत मालविली होती.होच्या स्मरनार्थ सायगावचे नाव हो चि मिन्ह टेवन्यात आले.
                    

लेनिन,माओ,मार्क्सप्रमाने हो हा कडवा कमुनिस्ट नव्हता तो कमुनिस्ट असन्याआधी एक व्हिअतनामी होता.व्हिअतनामच्या या लध्यात अमेरिकेने आपली प्रतिश्था गमाविली.आपल्या सामर्थ्याविशयी व्यर्थ अभिमान बाऴगुन फ़ाजिल आत्मविश्वासपोती अमेरिका या लध्यात उतरली होती पन तिच्या नशिबी शेवटी पराभवच होता कारन कडे हो चि मिन्ह प्रकाशाची वाट दाखविनारा मार्ग होता.

हो ची मिन्ह भाग ४


              उत्तर व्हिअतनामधील हानोइ या शहराचा हो च्या नेत्रुत्वाखालील व्हिअतमिन्ह या संघटनेने ताबा घेतला आनि हानोइ येथे व्हिअतनामचे सरकार स्थापन ज़ाले.आनि हो ची मिन्ह हा  व्हिअतनामचा अध्यक्श ज़ाला.व्हिअतनामवर स्वातन्त्र्याचा सुर्य उगविल्याचा भास ज़ाला.पन व्हिअतनामचे स्वातन्त्र्याचे हे स्वप्न क्शन्भुगुर टरले. कारन ब्रिटन फ़्रान्स ही साम्राज्यवादी राश्त्रे आपल्या वसाहती सहजासहजी सोडायला तयार नव्हते.दुसर्या महायुद्धानतरच्या करारात व्हिअतनामसह उर्वरीत इंडोचायना पुन्हा फ़्रान्सच्या पदरात टाकन्यात आले. फ़्रान्सने परत व्हिअतनामचा ताबा घेतला पन फ़्रान्सशी उघड लडा देन्याएवजी हो ने तुर्त तडजोड करायचे धोरन स्विकारले आनी फ़्रान्सशी तह करुन फ़्रेन्च युनियनचे सभासदत्व स्वीकारले.
           पन फ़्रान्सचा व्हिअतनामचे विभाजन करन्याचा कट लक्शात येताच हो चा फ़्रेन्च सरकार वरील विश्वास डऴ्मऴु लागला.आनि व्हिअतनाम व फ़्रान्स यान्च्यात हिंसक कलागतींना सुरुवात ज़ाली.त्यातच साम्राज्यवादी फ़्रेन्चाना होच्या राजवटीचे रशीया आनी चीनशी सख्य बोचु लागले. या लहान सहान चकमकी वाडत जावुन हैपान्ग येथील व्हिअतनामच्या सैनिकी चावनीवर फ़्रेन्चांनी हल्ला केला आनि ६००० व्हिअतनामी सैनिकांची निर्घ्रुनपने हत्या करन्यात आली.याचा बदला घेन्यासाथी व्हिअतनामी सैनिकानी हनोइ येथील फ़्रेन्चाची सरसकट कत्तल केली आनी हानोइ शहराचा ताबा घेतला पन थोडॉच दिवसात फ़्रेन्चानी प्रतिहल्ला करुन आपल्या रनगाडा पथकाच्या साहयाने व्हिअतनामी सैनीकाचा बीमोड करत हानोइचा ताबा परत मिवीला.यामुऴे हो,जिअप आनि इतर  व्हिअतनामी नेत्याना हानोइ शहर सोडून परगंदा व्हावे लागले आनी जंगलाचा आश्रय घ्यावा लागला. .यानतरची पुडची कही वर्शे फ़्रेन्च आनी व्हिअतनाम यान्च्यातील सन्घर्श विकोपाला गेला.हो चे सैन्य फ़्रेन्चान्शी गनिमी काव्याने लडत होते.
              अशाच एका सन्घर्शात जनरल जिअपच्या नेत्रुत्वाखालील व्हिअतनामी सैन्याने”दिएन-बिएन-फ़ु” येथील फ़्रेन्च तऴाला वॆडा दीला आनि कित्येक महीन्याच्या संघर्शात फ़्रेन्चाचा हा तऴ पुर्नपने नश्ट ज़ाला आनी जवऴपास २०,००० फ़्रेन्च सैनिक आनी अधिकारी मरन पावले.दिएन-बिएन-फ़ु य तऴाबरोबरच फ़्रेन्चान्चे मनोधैर्य देखील नश्ट ज़ाले होते. महायुध्दातील प्रचंड हानीनंतर या पराभवाने फ़्रेन्चांच्या मनोधैर्याची भिंत कोसऴली.दिएन-बिएन-फ़ु च्या पराभवानंतर फ़्रान्सला व्हिअतनाममधुन लवकरात लवकर बाहेर पडायच होतं. पन फ़्रान्स व्हिअतनाममधुन बाहेर पडले की व्हिअतनाम कम्युनिस्टांच्या प्रभावाखाली जानार हे नक्की होते आनी हिच बाब अमेरिकेला नको होती.कम्युनिस्टांचा प्रभाव रोखन्यासाथी अमेरिका त्यावेऴी काहीही करायला तयार होती. कम्युनिस्टांचा प्रभाव रोखन्यासाथी अमेरिकेने जिनिव्हा करारावर सही करायला फ़्रान्सला भाग पाडले आनि फ़्रान्सची सुटका केली.या करारान्वये व्हिअतनामचे दक्शीन आनि उत्तर असे भाग करन्यात आले.उत्तर  व्हिअतनाममध्ये हो चि मिन्ह च्या सरकारला मान्यता देन्यात आली तर दक्शिनेत पंतप्रधान म्हनुन दिएम नावाचा अमेरिकेचा हस्तक नेमन्यात आला.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
HTML Comment Box is loading comments...