गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१२

इन्जीनियरांच्या लव्हस्टोऱ्या:मोरपंखी (भाग 4 )

                       मग ओंकारची परवानगी मिळाल्यावर पिंकीने दोघांच्या रीलेशनविषयी तिच्या घरी सांगितलं.तिच्या घरी थोडी खळबळ माजली पण ते सार्वजन ओंकारला चांगले ओळखत असल्याने त्यांनी सरळ ओंकारला त्याच्या घरी हा  विषय काढण्यास सांगितले. मग ओंकाराने आपल उरलं सुरलं धैर्य एकवटून पप्पांना विचारलं,आणि मग पंधरा मिनिटांच्या प्रदीर्घ विचारानंतर पप्पा उद्गारले,

"हे लग्न शक्य नाही ,हे बघ पप्या(ओंकारला घरी पप्या म्हणतात ) अजून तू शिकतोयस ,तुला डिग्री मिळायला अजून तीन वर्ष लागतील कदाचित जास्तीही लागतील मग एवढी वर्ष त्या मुलीचं  लग्न अडवून ठेवन मला तरी बरोबर वाटत नाही "
                 
                      पप्पांकडून हे उत्तर मिळाल्यामुळे ओंकाराने मम्मीशी या विषयी बोलण्याचे टाळले.पण आता ओंकाराची सारी विचारशक्तीच खुंटली होती.पप्पा नाही म्हणतील अशी अपेक्षा त्याने कधीच केली नव्हती.त्याला हा नकार सहनच होत नव्हता.या सगळ्या गोंधळातच त्याचा m3 चा पापर दुसऱ्या दिवशी होता आणि या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अपेक्षेप्रमाणेच पेपर अवगड गेला m3 सुटण्याची काहीच आशा नव्हती आणि आशा मनस्थितीत m3 सुटणे शक्यच नव्हते . याच वेळी पिंकीचे फोन आणि एकनदरीतच या प्रकारामध्ये त्याला concentrate करता येईनासे झाले होते.या मुळे पुढचे ATD,ETCP हे पेपर देखील त्याने या प्रेशरमधेच  दिले . हे तिन्ही पेपर सुटणारच नाहीत हे त्याला समजून चुकले.ETCP चा  पेपर झाल्यावर ओंकाराने थोडा विचार केला आणि आपला मोबइल बंद करून ठेवला आणि सगळ विसरून अभ्यासाला लागला. आणि मोठ्या प्रयत्नाने concentrate  करून उरलेले विषय सोडविले.पुढचे १५ दिवस फोन नाही आणि मेसेजपण नाही.
                         परीक्षा झाल्या झाल्या ओंक्याने मुंबई गाठली.८ जानेवारी हि पिंकीशी भेटण्याची तारीख ठरवली.हि त्यांची भेट त्यांच्या प्रेम  कहाणी सारखीच विचित्र होती.कारण तशी हि त्यांची पहिलीच खरी भेट होती आणि पहिल्या भेटी आधीच त्यांनी आपल लग्न एकमेकांशी ठरवून टाकल होत.दोघेही त्या दिवशी त्यांच्या दूरच्या नातेवाइकांच्या घरी भेटले.पण घरात वादलाधारी माणसे असल्याने त्यांना नीटपणे बोलताच आले नाही.मग काय? शेवटी ओंकार इंजिनियर होता. आणि technology is friend of engineer ओंकाराने मोबाईल उचलला आणि मग दोघांनी समोरासमोर  chating सुरु केले.  आणि १२ तारखेला बाहेर भेटायचा प्लान बनविला.
                         १२ तारखेला दोघे फिरायला बाहेर पडले.दोघे एकमेकांत पूर्णपणे हरविले होते.भावना शब्द बनून बाहेर पडत होत्या.नॉनस्टोप गप्पा चालू होत्या.यावेळी ओंकाराच्या लक्षात आल कि पिंकीशिवाय जगण त्याला शक्य नाही.काहीही झाल तर आता तिच्याशीच लग्न करायचं.ती भेट मनात साठवून ओंकार कोल्हापूरला परतला.घरी आल्यावर त्याने आईला विश्वासात  घेऊन सगळ्या गोष्टी तिला सांगून टाकल्या.आईने पप्पांना समजावून सांगण्याच वाचन दिल.त्यामुळे आता आईच्या शब्दांवर विश्वास ठेवून ओंकार निश्चिंत झाला.
                          इकडे पिंकी येणाऱ्या प्रत्येक स्थळाला नकारच देत होती.शेवटी वैतागून तिचे मामा ओंकारला भेटायला आले,ओंकाराने त्यांना "मला पिंकीशीच लग्न करायचे आहे" हे पटवून दिले मग शेवटी एके दिवशी पिंकीचे वडील ओंकाराच्या पप्पांना भेटले.आणि त्यांना ओंकार आणि पिंकीच्या लग्नाविषयी विचारलं.ओंकाराचे वडील म्हणाले,
           
                           "ओंकारला डिग्री मिळाली कि दोन महिन्याच्या आत लग्नाचा बर उडवून देऊ,तुम्ही निश्चिंत असा "

                             आतल्या रूममधून हे संभाषण ऐकणाऱ्या ओंकारला आता अत्यानंदाने वेड लागायचं बाकी राहील होत.शेवटी आईची शिष्टाई यशस्वी झाली होती.
आता वर्षभरातच दोघांच लग्न होईल.मला आमंत्रण  मिळेल कि नाही कुणास ठाऊक पण लग्नात मी जाणार हे नक्की कारण त्याच्या लग्नात कदाचित मलाही एखादी "मोरपंखी " मिळून जाईल.

सोमवार, ३ सप्टेंबर, २०१२

इन्जीनियरांच्या लव्हस्टोऱ्या:मोरपंखी (भाग 3 )

               
                               ओंक्याला हे सुपरकुल,फब्युलस आणि माइंड ब्लोइंग उत्तर कस सुचलं असेल ते त्याला अजूनही कळलं नाही(एरवी तोंडातून शब्द फुटत नाही साल्याच्या  ).पण या प्रश्नाने आणि उत्तराने दोघेही काय समजायचे ते समजले.प्रपोज न करताच जेव्हा प्रेम मिळत तेव्हा तो आनंद अवर्णनीयच असतो.ज्या व्यक्तीला आपण व्यवस्थितपणे भेटलो देखील नाही त्या व्यक्तीशी जेव्हा ट्युनिंग जुळत आणि ती व्यक्ती आपली आहे अस जेव्हा मन सांगत तेव्हाच ते खर प्रेम असत.पिंकी आणि ओंकार या दोघानाही ते इतक्या सहजपणे मिळालं आहे अस त्यांना वाटत होत.
                   पण एवढ्या सहज तर आजकाल शिवाजी युनिव्हरसिटीचा एक्झाम फॉर्म देखील भरला जात नाही तर मग प्रेम तर फार लांबची गोष्ठ आहे.त्या दोघांची खरी लढाई तर आतापासून सुरु होणार होती.प्रेम करणं फार सोप असत पण ते निभावून नेण महाप्रचंड काम असत हे त्यांना आता कळणार होत.आणि आता हे महाप्रचंड काम ओंकारला करायचं होत.असे मेसेज आणि फोन मध्ये दिवस सुखाने जात होते.आता डिसेंबर उजाडला होतो.तिसऱ्या सेमिस्टरची परीक्षा ७ तारखेपासून सुरु होणार होती.ओंकार परीक्षेच्या तयारीत गुंतला होता.पण इकडे पिंकीची अवस्था बिकट होत चालली होती कारण तिच्या लग्नासाठी वर संशोधन प्रचंड वेगात सुरु होत आणि प्रत्येक येणाऱ्या स्थळाला ती नकार देत सुटली होती.शेवटी घराच्या लोकांच्या इमोशनल प्रेशरला कंटाळून ५ डिसेंबरला तिने ओंकारला फोन लावला आणि सारी परिस्थिती सांगून विचारलं,
                    
              "अरे, माझ्या घरी माझ्या लग्नाची बोलणी सुरु आहे,आपल्या रीलेशनबद्दल घरी सांगू का?" 
                  
           ओंकारासमोर आता फारच मोठ प्रश्नाचींह उभं राहील होत.कारण होय सांगितलं असत तर मोठाच प्रोब्लेम होणार होता,त्याच शिक्षण पूर्ण झाल नसल्यामुळे घरात त्याच्या लग्नाचा विचारदेखील नव्हता.आणि नको म्हटलं तर पिंकीच्या समोरचा  अडचणींचा डोंगर उभं होता.आता "आर या पार " या अट्टीट्युड ने त्याने उत्तर देवून टाकल,

                       " सांग "

 (बिचाऱ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता म्हणा )

क्रमश: ............................................  

रविवार, २ सप्टेंबर, २०१२

इन्जीनियरांच्या लव्हस्टोऱ्या:मोरपंखी (भाग 2 )


                            कसबस ताईच लग्न पार पडलं,पण रात्रभर ओंक्याच्या डोळ्यावर ती मोरपंखीच उभी राहत होती,उसने तो ईस बिचारे कि रातोंकी निंद हराम कर दि थी.आता ओंक्याला काहीही करून तिला भेटन भागच होत.लग्नानंतर ताईच्या सासरी गोंधळ होता,घरून सगळेच जाणार होते.ताईकडे जाण्याची तयारी पूर्ण झाली होती ओंक्या अगदी ठेवणीतले कपडे घालून तयार झाला.पण बाहेर येऊन बघतो तर काय? गाडीच्या फॅक्टर ऑफ सेफ्टी पेक्षा दुप्पट माणस बसल्यामुळे त्याला जागाच उरली नव्हती.त्याला न्यायचं कॅन्सल करायचा विषय चालू झाला आणि एवढ्यात त्याच्या बाबांचं लक्ष त्याच्या चेहऱ्याकडे गेलं.त्याचा रडका चेहरा बघून त्याला त्याच्या ताईची फारच आठवण येत असेल असा गैरसमज त्याच्या बाबांनी करून घेतला आणि मग त्यांनी नवीन गाडी भाड्याने घेतली.रात्री ताईच्या घरी पोचल्यानंतर ओंक्याची नजर सारखी आत वळत होती.या नव्या पाहुण्याला फारच भूक लागली असेल म्हणून पटकन पंगती वाढायला सुरुवात झाली.इतक्यात ती वाढायला आली आणि तिला पाहताच ओंक्याच्या अंगात बकासुर संचारला आणि ओंक्याने मग भावनेच्या  भरात तांबडा रस्सा,पांढरा रस्सा आणि मटनावर मनसोक्त ताव मारला.
                          जाताना  ताईची भेट घ्यायला गेला तेव्हा तिथे ती मोरपंखी बसलेली होती.ताईने मग दोघांची ओळख करून दिली. " पिंकी " हे नाव ऐकताच त्याने मनातल्या मनात " पिंकी ओंकार चव्हाण " या नावांची जुळवाजुळव केली हे नाव परफेक्ट जमतंय अस त्याच्या मनाला उगाचच वाटून गेलं.आणि तिथल्या गप्पांमध्ये पिंकीला मटणाचा वासही सहन होत नाही हे ऐकताच खाल्लेलं सार मटण गळ्याशी येतंय कि काय अस त्याला वाटून गेलं.आता तर मग ओंक्याने फुल अक्शनमध्ये येवून प्रतिज्ञाच केली,"पिंकी,तुमच्यासाठी कायपण,"सोडलय आता आम्ही मटनपण" या क्षणी ओंक्याने त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा त्याग पिंकीसाठी केला होता.जेव्हा एखादा कोल्हापूरचा माणूस कुणासाठीतरी मटण सोडतो तेव्हा त्याला आपलं प्रेम सिद्ध करायला दुसर कुठलच प्रमाणपत्र द्यावं लागत नाही.कारण मटण खाण सोडन आणि तेही एका कोल्हापुरकराने हा त्याच्या त्यागाचा परमोच्च बिंदू असतो.
काही दिवसातच मग सत्यनारायणाची पूजा होती , ओंक्याला आणखी एक चान्स मिळाला होता.या पूजेत ओंक्याने फारच प्रगती साधली होती त्याच्या प्रगती समोर तर चीनच्या प्रगतीचा दरही फिका पडला होता.पूजेच्या संपूर्ण संध्याकाळी नजरांचे बाण सटासट चालविले जात होते.ओंक्या तर क्षणाक्षणाला घायाळ होत होता.शेवटी निरोपाच्या क्षण आलाच.गाडीत बसताना पिंकीने ओंक्याला स्माईल दिली आणि एवढ्यात विजांच्या गडगडाटसह पाऊस सुरु झाला.एका वेगळ्याच रोमांटिक आनंदात ओंक्या परतीचा प्रवास करीत होता.बाहेर पडणारा पाऊस त्याच्या मनातील कल्लोळासमोर क्षणाक्षणाला फिका पडत चालला होता.आतातर ओंक्याला गप्प बसून चालणार नव्हता त्याने प्रचंड खटपटी करून सरतेशेवटी नंबर मिळविलाच.
                             २० जूनला त्याने तिला पहिला मेसेज केला.हाय ह्यालोपासून सुरुवात झाली.इकडच्या तिकडच्या गप्पा मारीत गाडी मुख्य रस्त्याकडे हळूहळू सरकू लागली होती,आणि प्रेमाचं इंजिन बेफामपणे धावू लागल होत. आपली परफेक्ट मच हीच आहे याची खात्री ह्या दोघांनाही हळूहळू पटू लागली होती.अश्याच एका निवांत क्षणी २२ जूनला पिंकीने ओंकारसमोर प्रश्नाचा अनपेक्षित बॉम्ब टाकला,
         "तुझा प्रेमावर विश्वास आहे?"
         .
         .
         .
         "माझा जेवढा तुझ्यावर विश्वास आहे तेवढाच विश्वास माझा प्रेमावर आहे." 
    

क्रमश: ............................................  

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
HTML Comment Box is loading comments...