मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१२

इन्जीनियरांच्या लव्हस्टोऱ्या:मोरपंखी (भाग १ )

                          इंजिनियरिंग स्टूडंटस मध्ये इंजिनियर कमी आणि प्रेमवीरच जास्त सापडतील.अशाच एका प्रेमवीराची हि कहाणी.इन्जीनियरांप्रमाणे त्यांच्या लव्हस्ठोर्यादेखील भन्नाट आणि एकदम वेगळ्या असतात. तसं पहायला गेलं तर हे स्वाभाविकच आहे म्हणा.पण अस्वभाविकारीत्या मागच्या वर्षी यामध्ये आणखी एका मेक बॉयची भर पडली,"ओंकार चव्हाण" हे संजीवनच्या मेक ब्रांचमधील एक मोठ आणि वजनदार प्रस्थ.(वजनदार म्हणजे याच्या शब्दाला मोठ वजन आहे आमच्या ब्रांचमध्ये ).काही लव्हस्टोऱ्या या हसवून डोळ्यात पाणी आणतात तर काही रडवून ओंकार आणि पिंकीची लव्हस्टोरी मात्र प्रेरणादायी प्रकारात मोडते.(मोटीवेशनल).ह्या दोघांची लव्हस्टोरी एकूण तर आमच्या कोलेजात कित्येकांना प्रेरणा मिळालीय( मलापण ).ह्यांची प्रेमकहाणी ऐकल्यावर ८० च्या दशकातील चित्रपटांची आठवण येते.तर आता आणखी जास्त प्रास्ताविक  न सांगता मी मूळ मुद्द्यावर येतो.
                          २८ मे २०१० पर्यंत प्रेम या गोष्टीवर अजिबात विश्वास न ठेवणारा ओंकार आपल्या ताईच्या लग्नाच्या तयारीत गुंतला होता.नेहमी प्रेम या गोष्टीची चेष्टा करणाऱ्या बिचाऱ्या ओंक्याला येत्या २४ तासात आपणही कुणाच्या तरी हृदयात नजरबंद होऊ याची पुसटशी देखील कल्पना नव्हती. २९ मे उजाडला आणि आपल्या लाडक्या , एकुलत्या एक बहिणीच्या लग्नात  ओंक्याने स्वत:ला सगळ्या तयारीत झोकून दिले होते.लग्न धुमधडाक्यात होत होत.लग्नात मानाचं असणारं " करवला " हे पद त्याच्याकडे असल्यामुळे वरपक्षाच्या बाजूकडे त्याची नजर सराईतपणे भिरभिरत होती.आणि इतक्यात त्याची नजर एका मोरपंखी रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेल्या मुलीकडे गेली.आणि मग काय विचारता "दिल कि घंटी बज गयी" त्या मोरपंखी रंगात ती प्रचंड सुंदर दिसत होती,(तशा लग्नात साऱ्याच मुली सुंदर दिसतात म्हणा,अर्धा किलो मेकअप केल्यावर दुसर काय होणार.)हा तर अश्या या स्वप्नातल्या परीजवळ ओंक्या आला आणि पाठीमागे गान सुरु झालं,
                        "पहला पहला प्यार है,पहली पहली बार है "

                        आता  ओंक्याला तिच्यात माधुरी आणि आराश्यात सलमान दिसू लागला होता.
                       गेले  पंधरा दिवस लग्नातलं प्रत्येक काम नीट करणाऱ्या ओंक्याच्या हातून आता चुका होऊ लागल्या होत्या,दाजींच्या बुटाऐवजी जेव्हा त्याने ताईच्याच चपला चोरल्या तेव्हा ते कुणाला कळलं नाही पण लग्नात जेव्हा तांदळाच्या ऐवजी साखर वाटू लागला तेव्हा मात्र सगळ्या मांडवात हास्याची लाट उसळली.पण काम करून दमला असेल बिचारा या सबबीखाली त्याला माफ करण्यात आला. खरी मजा तर पुढेच आली जेवण वाढताना.लग्न झाल्यावर ओंकारराव जेवणाच्या पंगती वाढू लागला.त्या मोरपंखीला आम्रखंड आवडत अस दिसून आल्यावर त्याने आम्रखंड वाढायला घेतलं.बायकांच्या पंगतीत २० वेळा वाढून झालं तरी हा तिथच ऊभा.त्या मोरपंखीच्या शेजारी बसलेल्या काकुना वाढताना त्यांच्या ताटात भातापेक्षा आम्रखंड जास्त झालंय आणि त्या काकूंना डायबेटीस आहे हे कळताच मात्र त्याने तिथून काढता पाय घेतला.



क्रमश...................

बुधवार, २२ ऑगस्ट, २०१२

माझ्या त्या साऱ्या कविता

कधीतरी बसतो असाच एकटाच लिहित 
मग कविता येते फुलून माझ्या वहीत 
सागराला मिळेल जेव्हा माझ्या जीवनाची सरिता
सोबत करतील मला तेव्हा माझ्या त्या साऱ्या कविता

वार्धक्याच्या त्या ओसाड रानात 
तारुण्य भेटेल मला पुन्हा कवितेच्या रुपात
निराशेने  त्या अंधारलेल्या  मनात 
कविता देतील मला आशेची खैरात

काहीही झाल तरी त्या माझ्याच असतील
पडलो झडलो तर मला सावरतील
उन,वारा ,पावसात मला जपतील
शेवटपर्यंत माझ्याशी त्या एकनिष्ठ राहतील

एखादी हसवेल,एखादी रडवेल
तो आनंद अन ती वेदना माझीच असेल
हक्क असेल माझाच कवितांवर साऱ्या 
जग मला विसरल्यावर सोबती होतील त्या खऱ्या

सरणावर पडलो तरी डोक्यात सदा फिरत राहतील
मरणावरही माझ्या त्या चार अश्रू तरी ढाळतील
मेल्यानंतरही त्या मला जिवंत ठेवतील
माझ्या त्या साऱ्या कविता माझ्या मरणाला अर्थ मिळवून देतील 

                                .............................................निखील माने 

बुधवार, १५ ऑगस्ट, २०१२

फर्स्ट यिअर

                                      फर्स्ट यिअर सुरु झाल एकदाच.नवे चेहरे,नवे मित्र(मैत्रीनीसुदधा),नावे चेहरे,सगळच नव नवीन वाटू लागलय.मरगळलेल्या कोलेज मध्ये नवीन चैतन्य भरून आल्यासारख वाटत.त्यांच्या चेहऱ्यावरील आश्चर्य,त्यांच्या डोळ्यातील स्वप्ने कुठेतरी ओळखीची वाटतात.त्यांच्या मनातील भीती तर स्वत:चीच आठवण आणून देते.तीन वर्षापूर्वी आपण कसे होतो याची आठवण आपसूकच जागी झाली. यांच्या शंका आणि यांचे प्रश्न हसून हसून पोट दुखविणारे असतात पण ते विचारण्यामागची त्यांची निरागसता काही लपत नाही.
                                     नुकतेच बारावी आणि CET च्या चरख्यातून मुक्त झाल्यामुळे झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यातून पदोपदी दिसून येत होता."आता सुटलो एकदाचे" हा भाव त्यांच्या प्रत्येक हालचालीतून दिसून येत होता. त्यांच्या मनात हजारो स्वप्ने उसळी मारतायत हे त्यांच्या चेहऱ्यावरून सहजपणे दिसून येत होत.पण काही दिवसात हा आनंद लोपनार हे आम्हाला माहित असल तरी या सगळ्याची जाणीव त्यांना करून देण्याचं धाडस आम्हाला झालं नाही कारण स्वप्न चुरगाळल्यावर काय होत हे आम्हाला माहित होत म्हणून जर वाट लागणारच आहे तर मग एवढी गडबड कशाला करा ह्या अट्टीट्युडने आम्ही गप्प बसून तो ओसंडून  वाहणारा उत्साह पाहण्यातच समाधान मानलं.
                                   पण ह्या फर्स्ट यिअर पेक्षा खरे उत्साही तर आमच्यातले काही हौशी कलाकार होते(विशेषत: मेक बॉयज).फर्स्ट यिअरच्या कुठल्या क्लास मध्ये किती चांगल्या मुली यापासून ते या वर्षातील सर्वात सुंदर मुलगी (लेखनमर्यादा जाणाव्यात खरा शब्द दुसरा आहे) हा किताबाची मानकरी ठरवली जाते.एकमेकांच्या वहिन्या ठरविल्या जातात(हे फक्त ठरविण्यापुरतच मर्यादित असतं कारण करण किती अवघड आहे हे सर्वांनाच माहित झालेलं असतं ).
                                  आता नव्याचे नऊ दिवस संपतील आणि हे नवीन दोस्त कधी इंजिनियरिंगच्या रंगात रंगून जातील हे कळायचंदेखील नाही.आता यांच्यातूनच मग नवे इंजिनियर निर्माण होणार आहेत यांचे पण किस्से ऐकायला मिळतील,यांच्यापण लव्हस्टोरया बनतील आणि हे पण मग या कॉलेजमधून बाहेर पडतील.& a circle will complete again....................................

सोमवार, १३ ऑगस्ट, २०१२

इन्जीनियरांच्या लव्हस्टोऱ्या:सुश्याचं प्रेमपत्र(भाग 3)


                     मी ताडकन उभं राहिलो.हि वेळ येणार हे माहित होत पण येवढ्या लवकर येईल हि अपेक्षा मी काय कुणीच केली नव्हती.अंतर्बाह्य हादरने या लहानपणी शिकलेल्या वाकप्रचाराचा अनुभव  मला  आत्ता पहिल्यांदाच येत होता.बिचाऱ्या सुश्याचा चेहरा सारखा समोर येत होता आणि या धक्क्यातून स्वत:ला कसाबसा सावरून घेत होतो तोच शेजारी बसलेल्या उम्याने स्वत:च्या मंद,मूर्ख आणि अतिशहाण्या  स्वभावाला अनुसरून प्रश्न विचारलाच,
                   "कुणाशी?"
                   "घुमे सरांशी!"
                     प्रमाणापेक्षा जास्तच लाजत फुगा उत्तरली.हे तीच उत्तर ऐकून आत्ताच्या आता हि धरती दुभंगावी आणि तिने मला पोटात घ्यावं असं वाटल नाहीतर कमीत कमी पुढच्या भिंतीवरून उडी टाकून जीव द्यावा अशी इच्छा मनात उफाळून आली.पण माझ्या आईला नातवंडांचा चेहरा पहायची इच्छा असल्याने मी स्वत:ला आवरलं.या सलग दोन धक्क्यातून सावरायच्या आतच फुगा माझ्या नावाची पत्रिका देऊन निघूनही गेली होती.
                    पंधरा मिनिटानंतर सावरलो,पण हे कस घडल याचा विचार करू लागलो.मग तिच्या काही मैत्रीण आणि माझे स्टाफरूम मधील सोर्स वापरून मिळालेल्या त्रोटक माहितीच्या आधारे जेव्हा वस्तूस्थितीच  जे काही चित्र उभं राहिलं तेव्हा तर  मी बेशुध्द पडायचा बाकी राहिलो होतो. खरी गोष्ट अशी होती कि,सुश्याने जेव्हा  टयुटोरीअलमधून प्रेमपत्र फुगला तील तेव्हा तिने ते उतरून उतरून काढलं पण ते लिहिताना "सबमिशन करताना त्यातील माहित हि गोपनीय आहे असे समजून मी ती कधीच वाचणार नाही "या इंजिनियरिंग स्तुडंतच्या प्रतीत्नेची तिने पुरेपूर आठवण ठेवली होती.आणि सुश्याच ते दोन पाणी प्रेमपत्र उतरून काढताना त्यातील एक अक्षरही वाचण्याचा त्रास तीन आपल्या अवजड शरीराला दिला नाही . आणि लिहून झाल्यावर ते घुमे सरांना सबमिट केल.आणि सरांनी आपल्या महाखडूस,महा........,महा............. (teacher's day जवळ आला असल्याने शब्द आणि भावना आवरल्या आहेत )स्वभावाला अनुसरून तीच एक ना एक अक्षर वाचून काढलं आणि त्या पत्रात नावं नसल्याने गैरसमज करून घेतला.त्यावेळी नक्की काय झाल असेल माहित नाही पण नक्कीच हा माणूस मायकल  ज्याक्सनचा  बाप बनून नाचला असणार हे नक्की! कारण अभ्यास करून पडलेल टक्कल ,रात्री जागरणं करून(कशासाठी जागत असेल हे कृपया विचारू नका ) डोळ्याभोवतीची वर्तुळ आणि जरा जास्तच शिकल्याने लग्नाचं उलटून गेलेलं  वय असं तगड आणि रुबाबदार व्यक्तिमत्व असलेल्या माणसाला अशावेळी हर्षवायू होणे स्वाभाविकच आहे.
                     मग काय! घुमे सर आपला सारा गोतावळा घेऊन फुगाच्या घरी हजार झाले.आणि सोयरिक जमवूनच बाहेर पडले.कारण ५०,००० पगाराचा जावई मिळन तसं भाग्याचाच लक्षण.म्हणून फुगाच्या वडिलांनी लगेच होकार कळवू टाकला आणि एवढा वेल सेटल(कि मेंटल)  नवरा मिळाल्यामुळे फुगाच्या नकाराचा प्रश्नच नव्हता.अश्या प्रमाणे फुगाच लग्न सरतेशेवटी ठरलं,घुमे सराच्या चेहऱ्यावरील आनंद कारंज्याप्रमाणे फुटून येत होता खरतर त्यांना हसताना आम्ही सगळे पहिल्यांदाच पाहत होतो..
                   आता हसावं कि रडावं हेच समजेनास झाल म्हणून शांतपणे बाहेर पडलो,सागरच्या दुकानातून दोन पाकीट घेतली,मोबाईल वर देवदासची गाणी डाऊनलोडीन्ग्ला टाकली आणि सुश्याची समजूत कशी काढायची या विवंचनेत त्याच्या रूमकडे चालू लागलो.........................

इन्जीनियरांच्या लव्हस्टोऱ्या:सुश्याचं प्रेमपत्र(भाग 2)

                       ते प्रेमपत्र त्याने मग नुकत्याच लिहिलेल्या टयुटोरीअलमध्ये अलगद ठेवून दिलं,टयुटोरीअल लिहील कि तो ते पहिल्यांदा फुगालाच देतो हे आतापर्यंत संपूर्ण पन्हाळा तालुक्याला माहित झालं होत.एवढ महान कार्य पार पडून सुशान्तराव शेवटी झोपी गेले.पण मला झोपी जाऊन चालणार नव्हत,मी पहिल्यांदा जाऊन होस्टेलच्या टेरेसला कुलूप लावलं,होस्तेलमधल्या सगळ्या दोऱ्या लपवून ठेवल्या.कारण त्या पत्राच उत्तर काय असेल ह्याचा अंदाज मला आतापर्यंत आला होता.पुढचे काही दिवस असेच शांततेत गेले .फूगाने ते पत्र वाचले अशी काही बातमी एकू आली नाही कारण सुश्याच्या रूममधून ना रडण्याचा आवाज वगैरे आला होता ना तो टेरेसकडे जाताना दिसला होता .त्यामुळे जसजसा वेळ जात होता तसं सर्वांची उत्सुकता वाढत चालली होती.शेवटी फूगाने ती टयुटोरीअल परत आणून दिली,तरीसुद्धा काहीच झाल नाही बिचारा सुश्या तर टेन्शनने मरायला आला होता पण तिने ती  टयुटोरीअल आधीच लिहिली असेल अस सांगून त्याची समजूत काढण्यात आली.आणि आता परीक्षा जवळ आल्यामुळे तुझ्या प्रपोजचा कार्यक्रम जरा लांबणीवर टाकू असं सांगून  त्याला अभ्यासाला बसविण्यात आलं.
                       असेच काही दिवस शांततेत गेले.preparation leave सुरु झाली होती.सर्व topper लोक आता वाघ जसा शिकारीवर तुटून पडतो तसे अभ्यासावर तुटून पडले होते.आणि मग थोड्याच दिवसात मी आमच्या नेहमीच्या कट्ट्यावर अभ्यास(?) करीत बसलेलो असताना फुगा तिथे आली.कदाचित सुष्याला शोधत तिथे आली,नक्कीच अभ्य्सात काहीतरी डाउट असेल असं मला वाटल.मला पाहताच ती माझ्याजवळ आली,आणि म्हणाली,
                   "अरे सुश्या कुठाय?"
                   "तो रूमवर अभ्यास करतोय,का? काही काम होत का?"
                   "अरे काही नाही,त्याला हि पत्रिका द्यायची होती "
                   "कसली?"
                   "अरे लग्नपत्रिका,माझं लग्न ठरलंय "

.......

 क्रमश...................         

शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१२

इन्जीनियरांच्या लव्हस्टोऱ्या:सुश्याचं प्रेमपत्र(भाग १ )

                               "सुश्या फुगाला प्रपोज करणार"
               हि बातमी संजीवनच्या होस्टेलमध्ये वणव्यासारखी पसरली.सुश्याच्या नेभळटपनाकडे बघून आणि त्याचा पूर्वेतिहास माहित असल्याने मी तिकडे फारसं लक्ष दिलं नाही.पण त्याला भेटून त्याचा रागरंग त्या बातमीवर विश्वास ठेवावाच लागला. 
               कॉलेजच्या शेवटच्या वर्षीतरी ती आपल्याला 'हो' म्हणेल या भोळ्या आशेपोटी हा बहाद्दर हे नसतं धाडस करतोय हे मला कळून चुकल.खरतर आमचा सुश्या आणि फुगा दोघेही कॉलेजमध्ये प्रचंड फेमस! अभ्यासात सतत टोप केल्यामुळे सुश्या आणि आपल्या जरा जास्त नखर्यामुळे फुगा कॉलेजमध्ये प्रचंड फेमस झाले होते. फुगाच हे जगावेगळ  नाव आम्ही पोरांनी पाडलं होत, कारण फस्ट यीअरला चवळीच्या शेंगेप्रमाणे असणारी फुगा जेव्हा मेसचं जेवण जेवून जेवून जेव्हा हळूहळू फुगू लागली तेव्हा कम्परीझनसाठी आम्हाला दुसरा शब्दच सापडला नाही.मेसमध्ये तिला जेवताना बघून जगात २५ कोटी भूकबळी आहेत याची खात्री पटायची,आणि ते का आहेत याचं कारणदेखील समजून यायचं.सुश्याला फुगात काय आवडल हे माहित नव्हत पण या वयात गाढवी पण अप्सरेसारखी दिसते हे समजून आलं होत.
             तर अस हे कपल कॉलेजमधल्या इतर कपल्सपेक्षा जरा वेगळ होत,कारण हे एक सिझनल कपल होत,ह्यांच्या दोस्तीचा सिझन फुगाच्या गरजेवर अवलंबून असायचा.म्हणजे सबमिशन ,प्रोजेक्ट,टयुटोरीअल अशावेळी दोघे हमखास एकत्र दिसायचे.पण जेव्हा या गोष्टी नसतील तेव्हा या दोघांतील अंतर मोजायला कोनात इंस्तृमेंट वापरावं हा यक्षप्रश्न आम्हाला पडत असे.कदाचित प्रेमाच्या भरती ओहोटीचा हा प्रकार असेल म्हणून आम्हीही तिकडे दुर्लक्ष करायचो.तरस हे सिझनल कपल अजून कन्फर्म नव्हत त्याच महत्वाच कारण म्हणजे नेभळट स्वभाव.एरवी तीन तीन तास गप्पा मारणाऱ्या सुष्याला ती तीन अक्षर उच्चारायला तीन वर्षात एकदापण जमल नव्हत.म्हणूनच गेले तीनही valentine day स्वत:ला बाथरुममध्ये कोंडून घेणारा सुश्या हा valentine day गाजवेल अशी कुणाचीही अपेक्षा नव्हती.पण आता हि बातमी ऐकून "आज कूच तुफानी होगी " हे मी ताडलं.
            प्रेमाचा प्रक्टिकल अनुभव शून्य असूनही थिअरीत प्रचंड विद्वान असणारे बुद्धीजीवी इन्जीनियर सुश्याच्या रुममध्ये न बोलविता फुकटचा सल्ला द्यायला जमा झाले.अगदी शोलेपासून थ्री इडीयटच्या प्रपोज स्टाइलवर विचार करणे सुरु झाले.पण कॉलेजजवळ कुठेच पाण्याची टाकी नसल्याने आणि त्यातही सुष्याला उंचावर चक्कर येत असल्यामुळे शोलेचा ऑप्शन बाद झाला.थ्री इडीयट प्रमाणे गर्ल्स होस्टेलवर जाण्याचा बेत सुश्याने सांगितला पण  गर्ल्स होस्टेलच्या वोचमनच्या हातात हा सापडला तर याचं काय होईल या काळजीपोट आम्ही त्याचा हा बेत हाणून पाडला.कारण हा वोचमन खली चा दुरून नातेवाईक लागतो असं आमच्या कानावर आलं होत.आणि त्याची अगडबंब शरीराकडे भागून ऐकणाऱ्याला ते पटायचं देखील.
           शेवटी जगन्नाथाने दिलेला प्रेमपत्र लिहिण्याचा सल्ला सर्वांनी उचलून धरला.खरतर हा मार्ग आउटडेटेड असला तरी निर्धोक आहे आणि सुश्यला मार बसण्याची शक्यता फारच कमी असल्याने आम्ही याला मान्यता दिली.प्रेमपत्र कस लिहायचं आणि कस पोचवायच हे प्रश्न आता समोर उभे होते.पहिला प्रश्न इंद्रजीतने लगेच सोडविला आणि गुगल वर love-letter असं टाइप करताच ७०००० रिझल्ट आले,मग सुश्याने टेबलवरील जर्नल पेपर उचलला आणि इमानदार  इन्जीनियरिंग स्तुडंटप्रमाणे कॉपी करायला सुरुवात केली.शेवटी कसाबस त्याचं ते तीन पाणी फर्ड्या इंग्लिश मधील प्रेमपत्र तयार झालं.आणि मग शेवटी दिपकने दिलेला दोघांचाही नाव न टाकण्याचा सुरक्षित सल्ला मान्य करून तो ते पत्र पोचवायला तयार झाला.
क्रमश...................

शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१२

वेदना

                           वेदना हि एक असामान्य शिक्षक असते. (pain is a excellent teacher).हे  वाक्य मी लहानपणी कुठतरी वाचलं होत.  कदाचित वयामुळे असेल किंवा या वाक्याचा अर्थ कळला नाही म्हणून फार काळच ती शिकवण विस्मृतीत गेली होती. 
                           पण आता सगळाच स्पष्ठ समजून येतंय. आणि अनुभवपण येतोय. एक गोष्ट माझ्या छोट्याशा आयुष्यात मला लक्ष्यात आली आहे ती म्हणजे बहुतांश लोकांना वेदनेपासून,दुखांपासून पळून जाणेच सोयीस्कर वाटते. वेदना या नकोश्या वाटतात. त्यांचा    आपल्या आयुष्याशी संबंध येऊ नये म्हणून प्रत्येकजण जपत असतो. ह्या गोष्टींचा तिरस्कार केला जातो.  मी मात्र या गोष्टींकडे जरा वेगळ्या पद्धतीने बघतो. मला नेहमीच वेदनेची गरज वाटते,वेदना हि माझी प्रेरणा आहे.माझ्या आयुष्यात वेदना नसती तर मी आज जो आहे त कधीच नसतो,म्हणून मी नेहमीच तिचा उपकृत असतो.
                         एकदा कॉलेजमध्ये कशाबद्दल तरी तक्रार करत असताना नांगरे सरांनी मला एक गोष्ट सांगितली होती. ''गरुडाची गोष्ट '',ते म्हणाले होते कि गरुडांच आयुष्य हे ८० वर्षाचं असत पण बहुतांश गरुड हि ४०व्या  वर्षांपार्यांतच जगतात. त्याच कारण असत कि ४०व्या  वर्षी त्यांच्या शरीरात अनेक बदल घडून येत असतात. गरुडाची चोच बोथट होत असते,त्यांच्या नख्या वाढतात आणि त्यांचे पंख झाडून जातात.या काही महिन्यांच्या कालावधीत त्यांना कोणताही आहार मिळत नाही. त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. जिवंत  राहण्यासाठी त्यांच्याकडे एकाच अघोरी उपाय असतो,त्यांना दगडावर आपटून आपली चोच तोडून टाकावी लागते, आपले उरलेसुरले पंख घासून काढावे लागतात. या वेदनेतून आणि संघर्षातून जो वाचतो तोच खरया अर्थाने जगण्यास लायक  ठरतो.त्याची वेदना त्याला नव्या आयुष्याची भेट बहाल करते.जेवढ्या जास्त हलापेष्ठ सहन कराल तेवढा जास्त फायदा होईल,  हाच सिद्धांत डार्विनने मांडलाय.
                            आज आजूबाजूला पाहिलं तर या गोष्टीचा लोकांना विसर पडलाय हे लगेच दिसून येईल. जेव्हा मी लोकांना आपल्या मुलांना आयुष्यभर आपल्याच  पदराखाली घेवून बसलेले पाहतो तेव्हा हि जाणीव अधिकच गडद होत जाते.आपण आपल्या मुलांना किती दिवस या सर्वापासून दूर ठेवणार आहोत? कधीतरी त्यांना या सर्वांचा सामना कराव लागणारच हि वस्तुस्थिती हे लोक नाकारताच असतात. आणि म्हणून हि मुल कधीच कणखर बनू शकत नाहीत. कारण त्यांच्या आईवडीलानी त्यांना कधीच ह्या शब्दाचा अर्थ कळू दिलेला नसतो.म्हणून  ज्याप्रमाणे आपली पूर्वजांची  शेपटी  नष्ट  झाली त्याप्रमाणे परिस्थितीशी लढण्याची आपली निसर्गदत्त देणगी आपण हरवून बसू अशी भीती मला नेहमीच वाटते    
माझ तर अस ठाम मत आहे, कि वेदना हि आपली एक जिवाभावाची मैत्रीण असते, ती आपल्या जवळ आयुष्यातील सगळ्यात कठीण आणि दुखद प्रसंगापासून सोबत करीत असते,त्या प्रसंगातून परत उभं राहण्याची प्रेरणा देत असते,ती आपल्या मनात सतत संघर्षाची ज्योत जागृत ठेवत असते.या मार्गावर आपली सोबत करीत असताना ती कधीही ध्येयाचा विसर पडू दात नाही.
                          तिची साथ असेल तरच अशक्य कोटीतील कामे शक्य होऊ शकतात.जगातील मोठमोठ्या लोकांना तिनेच घडविले आहे. म्हणून म्हणतोय तिच्यापासून पळू नका तिला आपली माना  तिच्यापासून प्रेरणा घ्या,ती तुम्हाला साथ देऊन तुमचा अनुभव आणि जीवन समृद्ध करण्यास मदत करेल.
                          तुमच्या आयुष्यात वेदना नसेल तर मात्र तुम्ही सामान्यच राहाल, कारण असामान्य गोष्टी करण्याची गरज तुम्हाला वाटणार नाही.  

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
HTML Comment Box is loading comments...