मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१३

बुद्धिबळ


                    परवा संजीवनमध्ये(माझं  कॉलेज ) बुद्धिबळाच्या स्पर्धा होत्या.सहज टाईमपास म्हणून या टेबलावरून त्या टेबलावर बुद्धिबळाच्या पतांचे निरीक्षण करीत हिंडत होतो.असाच फार वेळ हिंडल्यावर एका टेबलावर नजर स्थिरावली,आणि जरा विचार केल्यावर माझ्या एक गोष्ट लक्षात आली कि  बुद्धिबळात आणि आपली नॉर्मल आयुष्यात फार साम्य आहे.  बुद्धिबळात सोंगट्याच्या चाली वेगवेगळ्या असतात आणि त्याच प्रमाणे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या स्वभावात देखील आपल्याला फरक दिसून येत असतो.प्रत्येक सोंगटीच्या चालीबरोबर मला आजूबाजूला आढळणाऱ्या व्यक्तिरेखांशी आढळणार साम्य दिसून आलं.आणि जेव्हा मी या सगळ्या सोंगट्याचा अभ्यास केला तेव्हा मला हे कळून चुकल कि  बुद्धिबळ या खेळाची रचना हि आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहे.मला जे समजल ते मी पुढे मांडत आहे,

प्यादा :-
            प्यादा हा बुद्धिबळातील सगळ्यात साधा घटक.जगाप्रमाणे बुद्धिबळातही यांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे आणि यांच्याकडे कोणतेही विशेष कसब नसते,यांची झेप आणि चाल देखील छोटी असते पण तरीही ते महत्वाचे असतात.कोणत्याही कंपनीचा पाया जसा त्यांची work force असतो,तसा हा बुद्धिबळाचा पाया असतो. याना काही जास्त महत्व दिल जात नाही,उलट जेव्हा महत्वाच्या सोन्गटीला वाचावयाच असतं तेव्हा यांचा सोयीस्कररीत्या बळी दिला जातो कारण त्यांच्या नसण्याने कुणाचेही काही अडत नाही.यांना नेहमी पुढे उभं केलं जात(का ते माहित नाही कदाचित प्रहार झेलण्यासाठी ). 
    पण जेव्हा यातलाच एक प्यादा संपूर्ण पट पार करून पलीकडे पोहोचतो तेव्हा त्याचा वजीर होतो.that means खऱ्या आयुष्यातदेखील प्रत्येक प्याद्याला संधी असते,तोही वजीर बनू शकतो पण त्यासाठी त्याला परिस्थितीचा पट पार करण्यासाठी झगडाव लागतं .

हत्ती :-
     प्रचंड ताकद आणि सरळमार्ग,असं "rare combination". आपली प्रचंड ताकद वापरताना सरळ आणि नैतीकतेने वापरण्याची अक्कल यांच्याकडे असते.हे लोकच बुद्धिबळ आणि समाजाचे खरे बल असतात.

घोडा :-
     यांची चाल समाजाने  थोडे अवघड असते.यांच्यात झेप घेण्याची कुवत असते.शत्रूसाठी यांचा धोका ओळखण फार अवघड असत कारण म्हणजे इतर कुणाकडेही नसलेली चाल यांच्याकडे असते आणि ते अडथल्यापलीकडेही पाहू शकतात यामुळे यांच्या पंखाखाली फार मोठा प्रदेश असतो. 

उंट :-
     तिरकी चाल.तिरक्या चालीच्या उंटाबद्दल मी वेगळ काय सांगणार कारण आपल्यापैकी प्रत्येकजण कधीना कधीतरी या अशा लोन्कांकडून भाजलेला असतो.तरीही असे लोक समाजात असतात आणि त्यांना समाजात  स्थान देखील असते.

वजीर :-
      बुद्धिबळाच्या पटावरचा " सर्वशक्तीशाली योद्धा ".यांच्या भात्यात अनेक शस्त्रे असतात, यांच्या चाली अनेक असतात.शत्रूसाठी सर्वात धोकादायक म्हणून याचं नाव असत.हा जेव्हा पटावर असतो तेव्हा बाजी जिंकण्याच्या आशा असतात आणि जेव्हा तो नसतो तेव्हा साऱ्या आशा मावळतात.हा नेहमी फ्रेममध्ये असतो.साऱ्यांच लक्ष याच्याकडेच लागून राहिलेले असते.हा त्या पटाचा खरा नेता/लीडर असतो.

राजा :-
      राजा हा top ला असतो.तास पाहिलं तर हे देखील एक प्यादाच असतं यांच्यात कोणताही विशेष गुण किंवा कसब नसतो  .पण सत्ता,अधिकार आणि पैसा या गोष्टी  त्याला उच्च  बहाल करतात. बुद्धिबळात आणि माझ्या मते समाजातही  लोक  उपयूक्त ठरत नाहीत उलट त्यांना वाचविण्यासाठी,त्याचं रक्षण करण्यासाठीच इतरांची शक्ती आणि वेळ खर्च होत असतो. 


                माझ्यामते ज्याने कुणी  बुद्धिबळ हा खेळ बनविला त्याने तो बनविताना तत्कालीन समाजातील या गोष्टी नक्कीच लक्षात घेऊन या महान खेळाची रचना केली असेल .

1 टिप्पणी:

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
HTML Comment Box is loading comments...