गुरुवार, २१ मार्च, २०१३

चे गव्हेरा



चे  गव्हेराचा फोटो लाखो टी शर्ट वर पाहिलय ,पण चे  गव्हेरा कोण हे किती जणांना माहित आहे?
          
              


                   चे  गव्हेराचा हा फोटो जगातील सगळ्यात प्रसिध्द फोटो आहे,चे  गव्हेरा पेक्षा त्याचा फोटोच प्रसिध्द आहे.  ज़नरलि हे उलट असत. डॉक्टर गव्हेरा  हा मार्क्सवादी क्रांतिकारक, लेखक, गनिमी लढवय्यांचा म्होरक्या, राजकीय नेता आणि लष्कर तज्ञ होता.पेशाने डॉक्टर असला तरी गनिमी काव्याच्या लढाईत त्याच्यासारखा कसलेला योद्धा विसाव्या शतकात तरी शोधून सापडणार नाही.अर्जेन्तिनाचा नागरिक असला तरी त्याने दक्षिण अमेरिकेतील कित्येक देशांमध्ये सशस्त्र लढा दिला . 
               परवा मी लायब्ररीतून एक बुक काढलं The motorcycle diaries तेव्हा मला समजल कि चे गव्हेरा या डॉक्टरच एका क्रांतिकारक महानायाकात रुपांतर कस झालं.चेला डीग्री मिळाल्यानंतर त्याने संपूर्ण दक्षिण अमेरिका खंडाला मोटार सायकलीवरून वळसा घालण्याचा बेत आखला . त्याच्या या मोहिमेत त्याचा मित्र अल्बारतो हा त्याच्या साथीला होता .चे ने १९५२  आणि ५३ साली चिली,कोलंबिया,पेरू,पनामा,क्युबा  या देशांना भेटी  दिल्या. या भेटीमध्ये त्याने दक्षीण  अमेरिकेतील दारिद्र्य,गरिबी,दु:ख यांचा सामना केला . आणि या देशांतील नागरिकांच्या दुरवस्थेला अमेरिकाचा कारणीभूत आहे असं त्याच ठाम मत बनलं .याच भटकंती मध्ये  ''दक्षिण  अमेरिकेला एकाच पूर्वजांचा वारसा मिळाला आहे आणि दक्षिणेकडील लोकांनी एकत्र आले पाहिजे'' अशी चे ने मत बनविले .पुढे  क्युबा आणि बोलिव्हिया मध्ये लढताना त्याने हाच विचार डोळ्यासमोर ठेवला होता .
             दक्षिण अमेरिका फिरून झाल्यावर चे ने मेक्सिकोमध्ये एका इस्पितळात नोकरी पकडली.चे गव्हेरा मेक्सिकोमध्ये असताना त्याची भेट फिडेल कअस्ट्रो शी झाली त्यावेळी त्या दोघांमध्ये मैत्री झाली आणि मग पुढे बतीश्ता सरकारच्या विरोधात चे फिडेल च्या मदतीला धावला होता .   पण मनातील उर्मी स्वस्थ बसू देत नसल्यामुळे त्यानंतर बतीश्ता सरकारच्या विरोधात सशस्त्र लढा देण्यासाठी  चे ने फिडेल आणि राउल च्या मदतीसाठी क्युबामध्ये जायचं ठरवील,यासाठी एका छोट्या जहाजातून आपल्या ८२  क्रांतिकारक सैन्यासह तो क्युबाच्या किनारपट्टीवर उतरला . पण बतिष्टच्या सैन्याने हल्ला केल्यामुळे त्याचे अनेक साथीदार मारले गेले.  जीव वाचविण्यासाठी आणि प्रतिहल्ला करण्यासाठी चे ने तिथल्या पर्वत रांगात आश्रय घेतला . तिथे त्यांना स्थानिक लोकची मदत मिळाली.यानंतर मग चे,फिडेल आणि राउल कस्ट्रो यांनी क्युबाचा तो प्रसिध्द "२६ जुलैचा उठाव " केला . या उठावामध्ये आपल्या मुठभर सैन्याच्या मदतीने बतीस्त च्या हजारोंच्या सैन्याचा पराभव केला आणि बतीश्ता ला क्युबा सोडून पळून  जाण्यास भाग पाडले .  क्युबामधील उठावानंतर चे ने क्युबाच्या पुनर्बांधणीमध्ये मोलाची कामगिरी बजावली . त्याला क्युबाच्या राष्ट्रीय बँकेचे गव्हर्नर पद देण्यात आले.
                क्युबाच्या पुनर्बांधणीसाठी त्याने रशियाकडून मदत घेतली .त्याने या काळात भारत,जर्मनी,इजिप्त अशा अनेक देशांना भेटी दिल्या .  क्युबा स्थिर झाल्यानंतर त्याने क्युबाच्या राजकारणातून अंग काढून घेतले. पण त्याच्यातील  क्रांतिकारक त्याला शांत बसू देत नव्हता . त्याने मग कोंगो या आफ्रिकन देशातील क्रांतीत सहभाग घेतला . त्याला अन्यायाविरुध्ध लढा देण्यासाठी कोणत्याही देशाच्या सीमा मंजूरच नव्हत्या . कोंगो मध्ये त्याने आपल्या गनिमी काव्याच्या तंत्राचे प्रशिक्षण आफ्रिकन लोकांना दिले. याही ठिकाणी त्याच्या युद्धतंत्राने कोंगो सरकारला मात दिली.
 
                कोन्गोमधील मिशन संपल्यावर  चे गव्हेरा आता बोलीवियाच्या क्रांतीत सहभागी झाला .   सुरुवातीच्या काळात गव्हेराच्या मोजक्या सैन्याने बोलीवियाच्या प्रशिक्षित सैन्याचा छोट्या चकमकीत सपशेल पराभव केला . पण नंतर अमेरिकन सरकारने बोलिविया सरकारला प्रशिक्षित कमांडो पुरवायला सुरुवात केली .त्याचबरोबर गाव्हेराच्या सैन्याचा क्युबाशी असलेला रेडियो संपर्क तुटला या सर्व अडचणींमुळे गव्हेरा आणि त्याचे क्रांतेकारी एकटे पडले . पण गव्हेरा अजून बोलीवियामाध्येच टिकून होता पण अचानक एका रात्री बोलिव्हियाच्या आर्मीने गाव्हेराच्या तळावर हल्ला केला . गव्हेराच्या  सर्व साथीदाराना अमानुषपने मारून टाकण्यात आले आणि जबर जखमी  असलेल्या गाव्हेराला पकडण्यात आले आणि दुसर्या दिवशी त्याचा खून करण्यात आला . त्याचे शेवटचे शब्द होते ,''मला माहित आहे तुम्ही मला मारायला आलात,पण तुम्ही मला मारलं पण क्रांती अमर राहील "

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
HTML Comment Box is loading comments...